सारिका नवनाथ घुगे महाराष्ट्र उद्दोग भुषण पुरस्काराने सन्मानित


अंबाजोगाई येथील प्रसिद्ध र्हदयरोगतज्ञ डॉ.नवनाथ घुगे यांच्या पत्नी तथा संस्कृती इंडियन इथनिक वेअर या नावाने सुरु केलेल्या उद्योग विश्वाला झळाळी मिळवून देणार्या सौ.सारिका नवनाथ घुगे यांना सन 2023 चा राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार नुकताच जाहिर झाला होता त्याचे वितरण नुकतेच रविवार दि 6 ऑगस्ट रोजी नाशिक येथे सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सौ.घुगे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
स्त्री अधिक प्रभावशाली दिसण्यासाठी सुरु केला विविध आभुषणांचा व्यवसाय!
सौ.सारिका घुगे यांनी अंबाजोगाई शहर आणि परिसरात नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवून महिला भगिनींच्या आवडनिवडीनुसार आणि विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करुन आजची स्त्री ही अधिक रुबाबदार आणि प्रभावशाली दिसली पाहिजे म्हणून त्यांची आभूषणे किंवा त्यासंबंधीत जे काही महिला भगिनींचे सौंदर्य ज्यातून खुलणार आहे अशा वस्तूंचे दालन सुरु करुन त्या माध्यमातून महिला भगिनींना अधिक सर्वांगसुंदर बनविण्याचा प्रयत्न त्यांच्या हातून झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा अभिनव असा उपक्रम शहरांमध्ये सुरु केला आहे. त्यांच्या सेवेमुळे महिला भगिनी या पुर्णतः समाधानी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. संस्कृती इंडियन इथनिक वेअर या नावाने हे दालन सुरु करुन त्यातंर्गत महिला भगिनींना वेगवेगळ्या माध्यमातून सुसंस्कृत बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंबाजोगाई शहरांमध्ये असा हा व्यवसाय प्रथमच सुरु केल्याने असंख्य महिला भगिनींना या सेवेचा लाभ घेतला आहे.


रिसील डॉट इन या नामांकित कंपनीने घेतली दखल!
त्यांच्या कामाची दखल रिसील डॉट इन या नामांकित कंपनीने घेऊन सौ.सारिका यांच्या व्यवसायातील वेगळेपणाचे महत्व लक्षात घेवून त्यांनी अल्पावधीत उच्च दर्जाचे आणि सर्व प्रकारचे डिझाईन असलेले ब्लाऊज, साड्या आणि इतर उत्पादने ही सर्व सामान्य ग्राहकांपासून ते उच्च पदस्थ व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. सारिका यांनी मोठ्या कल्पकतेने महिला भगिनींची रुची ज्यामध्ये आहे त्याकडे लक्ष केंद्रीत करुन त्या वस्तू योग्य दरात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कामाची दखल वरील संस्थेने घेवून सौ.घुगे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार 2023 हा नुकताच जाहिर केला होता.
प्राजक्ता माळी यांच्या हस्ते झाला सन्मान!


सदरील पुरस्काराचे वितरण रविवार दि. 6 ऑगस्ट रोजी नाशिक येथे प्रख्यात सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सौ.सारिकाताई घुगे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वस्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. कारण एक गृहिणी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना व्यवसायिक जबाबदार्यासुद्धा तेवढयाच ताकदीने पेलत मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आणि संस्काराच्या बाबतीत ही त्यांनी महत्वपूर्ण भुमिका निभावलेली आहे. म्हणून त्यांच्या कार्याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.