महाराष्ट्र

सामान्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी अंबाजोगाई पिपल्स बॅंक कार्यरत

चेअरमन राजकिशोर मोदी यांची माहिती


शहर आणि परिसरातील सामान्य लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अंबाजोगाई पिपल्स बॅंकेची स्थापना करण्यात आली असून केवळ या एकच उद्देशाने ही बॅंक गेली अनेक वर्षे कार्यरत असल्याची माहिती चेअरमन राजकिशोर मोदी यांनी सांगितली.
अंबाजोगाई पिपल्स बॅंकेच्या चेअरमनपदी राजकिशोर मोदी यांची तर संचालकपदी हर्षवर्धन वडमारे यांची निवड झाल्याबद्दल मॉर्निंग ग्रुप च्या वतीने योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. पंडीत कराड सर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या सत्कारास उत्तर देताना राजकिशोर मोदी बोलत होते.


आपल्या विस्तारीत भाषणात राजकिशोर मोदी पुढे म्हणाले की, केवळ १० लाख रुपयांच्या भांडवलावर स्थापन करण्यात आलेली अंबाजोगाई पिपल्स बॅंक आज केवळ शहरातील नव्हे तर राज्यातील एक अग्रगण्य बॅंक झाली आहे. अंबाजोगाई शहरातील एकुण दैनंदिन आर्थिक उलाढाललीपैकी ४० टक्के आर्थिक उलाढाल ही पिंपल्स बॅंके मार्फत होते. शहर आणि परिसरातील नागरीकांची जवळपास ४० हजार खाती अंबाजोगाई शहर, जोगाईवाडी आणि मोरेवाडी येथील विस्तारीत शाखेमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली. योग्य आणि तप्तर सेवा यामुळे केवळ १० लाख रुपयांच्या भांडवलावर सुरु करण्यात आलेल्या या बॅंकेत आज ५०० कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे त्यांनी सांगितले.


यावर्षी बॅंकेच्या कारभारात नवीन पिढीतील तरुणांचा सहभाग असावा म्हणून आठ तरुण संचालकांना संचालक मंडळात स्थान दिले असून आपल्या कल्पकतेने शहरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या हर्षवर्धन वडमारे यांचा समावेश केला असल्याचे सांगितले. तरुण संचालकांच्या सहभागाने बॅंकेमध्ये नाविण्यपूर्ण योजना राबविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुदर्शन रापतवार यांनी तरुण संचालक हर्षवर्धन वडमारे यास जबाबदारीचे भान लक्षात आणून देण्यासाठी आणि संचालक म्हणून चेअरमन राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करता यावे यासाठी आणि चेअरमन पदी झालेल्या राजकिशोर मोदी यांच्या निवडीचे स्वागत करण्यासाठी या सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित संचालक हर्षवर्धन वडमारे यांनी चेअरमन राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यापुढे आपण काम करु व त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे सांगितले.


या कार्यक्रमात राजकिशोर मोदी यांचा सत्कार ऍड‌ किशोर गिरवलकर, कान्हा भाऊ शर्मा, शेख जमीलभाई यांच्या हस्ते करण्यात आला तर नवनिर्वाचित संचालक हर्षवर्धन वडमारे यांचा सत्कार सुभाष बाहेती, प्रा. पंडीत कराड, कचरुसेठ सारडा यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास मॉर्निंग ग्रुपचे सर्व संचालक उपस्थित होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker