सांस्कृतिक-कलेचा वारसा जतन व्हावा म्हणून धृपद महोत्सवाचे आयोजन; अक्षय मुंदडा यांच्या हस्ते उद्घाटन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230416-WA0111-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230416-WA0111-1024x682.jpg)
अंबाजोगाई शहराला एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि कलेचा वारसा आहे हा वारसा जतन व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाचे वतीने या तीन दिवसीय धृपद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा वारसा जतन करण्याचे काम अशा वेगवेगळ्या सिंगितिक कार्यक्रमाचे आयोजन करुन करण्यात येईल असे मत युवा नेते अक्षय मुंदडा यांनी व्यक्त केले.
अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखावजवादक पद्मश्री शंकरबापु आपेगावकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दि. 15 ते 17 एप्रिल दरम्यान मुकुंदराज सभागृहामध्ये धृपद संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करतांना अक्षय मुंदडा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रख्यात धृपद गायक उदय भवाळकर, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख कविता नेरकर, सांस्कृतिक संचालनालयाचे पटेल, ढगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230416-WA0112-682x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230416-WA0112-682x1024.jpg)
यावेळी विस्ताराने बोलतांना अक्षय मुंदडा पुढे म्हणाले की, ज्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी या धृपद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्या कै. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांनी वाढविलेल्या पखवाज या वादन कलेचा आपेगाव ते अमेरीका हा केलेला प्रवास हा थक्क करुन सोडणारा, कला क्षेत्रातील तरुण मुलांना एक प्रदीप ठरणारा आहे. संगीत मग ते कोणत्याही प्रकारातील असो माणसाच्या सुख दु:खात आत्मसमाधान मिळवून देण्याचे फार मोठं काम करते. म्हणून या तीन दिवसीय संगीत समारोहाचा आस्वाद शहरातील संगीत प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230416-WA0113-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230416-WA0113-1024x682.jpg)
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पं. उध्दलवबापु आपेगावकर यांनी या तीन दिवसीय धृपद समारोपाच्या आयोजनामागील संकल्पना सांगितली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पं. प्रकाश बोरगावकर यांनी केले.
या उदघाटनीर कार्यक्रमानंतर लगेच पं. उध्दबापु आपेगावकर आणि टीम च्या वतीने मंगल वाद्य ’पखावद वंदना’ सादर करण्यात आली. तर धृपद गायनासाठी भोपाळ येथील उस्ताद अफजलजी हुसेन तर नवीदिल्ली येथील धृपद गायन पद्मश्री उस्ताद वसिफुद्दीन डागर हे सादरीकरण केले.
रविवारी 16 एप्रिल रोजी पुणे येथील विदुषी मेघना सरदार, पं.उदयजी भवाळकर यांचे धृपद गायन होईल. तर तर बिहार येथील पं.प्रेमकुमारजी मल्लीक व पं.प्रशांत मल्लीक यांचे धृपद गायन व जुगलबंदी रंगणार आहे.
सोमवारी पं.भूषण कोष्टी (सुर बाहर वादन) तर कोलकत्ता येथील पं.सुप्रियो मैत्रो यांचे धृपद गायन होईल.त्यानंतर उ.मोई.बहाउद्दीन डागर (मुंबई) यांचे रूद्रविना वादन होईल. त्यांना विवेक कुरंगळे हरिप्रसाद गाढेकर, सनतकुमार बडे, आसाराम जोशी, आनंत जाधव, बंकटकुमार बैरागी, प्रशांत घरत, गुडे सर हे सातसंगत करणार आहेत.
वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या सहयोगाने व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे वतीने होत असलेल्या या तीन दिवसीय धृपद संगीत महोत्सवाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.