महाराष्ट्र

सर्दी खोकला कमी व्हायचे नाव घेईना; कोवीड नंतर आता H3 N2 चा धोका

सर्दी, खोकला तापी च्या साथीने महाराष्ट्र परेशान

कोवीड ची भिंती मनामधुन जात असतांनाच आता H3 N2 या नव्या व्हायरस ने देशात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह भारतीय आरोग्य संघटनेने ही या H3 N2 इंन्फ्लुएंझा संबंधी सतर्क राहण्याचा इषारा दिला आहे.

मार्च अखेर पर्यंत राहणार साथ

H3 N2 इन्फ्लुएंझाने देशात खळबळ उडवून दिली आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील अनेक राज्यात याने हातपाय पसरले आहेत. यामध्ये केरळ, पंजाब आणि हरियाणा, महाराष्ट्र राज्यासह इतर अनेक राज्यांमध्ये आपला फैलाव सुरु केला आहे. कोरोनानंतर H3 N2 व्हायरसचा कहर लोकांना घाबरवत आहे. हे पाहता सरकारने इन्फ्लूएंझाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ICMR ने एडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये लोकांना खबरदारीच्या पद्धती सांगण्यात आल्या आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मार्च अखेरीस सीझनल इन्फ्लूएंझा कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.


देशात H3N2 इन्फ्लूएंझाची सुमारे 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी काही H1N1 आहेत. आतापर्यंत फक्त या दोन प्रकारचे इन्फ्लूएंझा व्हायरसबाबत माहिती मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, देशातील सर्व राज्यांमध्ये मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग केले जात आहे. हे IDSP नेटवर्कद्वारे रिअल टाइम आधारावर केले जात आहे.
विशेषत: सीझनल इन्फ्लूएन्झाच्या H3N2 उपप्रकाराची प्रकरणे निरिक्षणाखाली आहेत. ICMR ने या संदर्भात एक सूचना जारी केली आहे. इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी हे सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की मार्च अखेरीस इन्फ्लूएन्झा कमी होण्याची अपेक्षा आहे.

दोन तीन महिन्यांपासून सुरू आहे प्रादुर्भाव

या महिन्याच्या सुरुवातीला, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने सांगितले की, भारतात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सतत खोकला आणि तापासह सर्दी होण्याचे कारण म्हणजे ‘इन्फ्लुएंझा ए’ चा ‘H3N2’ उपप्रकार आहे. त्याच वेळी, इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात वाढत्या खोकला आणि सर्दी प्रकरणांमध्ये अँटीबायोटिकच्या अतिवापराबद्दल इशारा दिला होता.

H3 N2 हा इन्फ्लुएंझाचाच उप प्रकार


H3N2 व्हायरस हा इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार आहे. त्याला हाँगकाँग फ्लू असेही म्हणतात. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, हा विषाणू शरीराच्या रोगांपासून संरक्षण करणाऱ्या व्हाईट ब्लड सेल्स (WBC) कमी करतो. यामुळे ल्युकोपीनिया होतो. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा व्हायरसमुळे गंभीर स्थिती निर्माण होते.

ताप रहातो 1आठवडा, तर खोकला रहातोय 3 ते 4 आठवडे

H3N2 व्हायरसमुळे तापातून बरे होण्यासाठी 5-7 दिवस लागतात. . खोकला निघून जाण्यासाठी 3-4 आठवडे लागतात. यामध्ये पॅरासिटामॉल घेता येते. या व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटिबायोटिक्स न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांच्या मते, यामुळे शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधक क्षमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे समस्या आणखी वाढू शकतात.

त्याप्रकरणी एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे की, हा आजारही आता कोरोनासारखाच पसरत आहे. H3N2 प्रकारचा इन्फ्लूएंझा विषयी बोलताना मेदांता हॉस्पिटलमधील इंस्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, H3N2 हा इन्फ्लूएंझा व्हायरसचाच एक प्रकार आहे. तो दरवर्षी या काळात दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ. गुलेरिया म्हणाले की, हा एक विषाणू असून तो कालांतराने बदलत जातो. त्याला अँटीजेनिक ड्रिफ्ट असंही म्हटले जाते. ते म्हणाले की, यापूर्वी एका महामारीत- H1 N1 विषाणू आढळून आला होता. तर आता त्याचा प्रसारित ताण H3N2 आहे, म्हणून हा एक सामान्य इन्फ्लूएंझा हाही तेवढाच ताण असून हा आजार कोरोनासारखाच पसरतो आहे.

खबरदारी घेणे आवश्यक

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये ताप, घसादुखी, खोकला, अंगदुखी, नाक वाहण्याचे रुग्ण समोर येत आहेत.त्यामुळे दिल्लीतही फ्लूचे रुग्ण वाढत आहेत.
राजधानीतील विविध रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये अशा रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. डॉ.गुलेरिया म्हणाले की, अशा परिस्थितीत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी अधिका काळजी घेणे गरजेचे आहे.

त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क वापरणे, वारंवार हात धुवावेत असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे. <याशिवाय सोशल डिस्टन्सही राखला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. ज्यांना हा त्रास अति आहे त्यांच्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इन्फ्लूएंझासाठी लस उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

या लोकांना संसर्गाचा अधिक धोका !

ज्या वयाच्या लोकांना दम्याचा त्रास आहे, फुफ्फुसाचा गंभीर आजार आहे. अशा लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याचबरोबर वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
त्यामुळे लोकांनी गर्दीची ठिकाणे टाळा, हात चांगले धुवा
आणि फ्लू विरूद्ध लसीकरण करण्याचा सल्लाही यावेळीतज्ञांनी दिला आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker