समृध्द वाचनाने लेखनात प्रगल्भता येते; डॉ. अर्चना कुडतरकर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230126_164344-300x150.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230126_164344-300x150.jpg)
ज्याप्रमाणे एखाद्या भाषेची समृद्धता ही त्या भाषेमध्ये असलेल्या साहित्यावरून ठरते, त्याचप्रमाणे एखाद्या लेखकाची लेखन समृद्धता ही त्याने केलेल्या वाचनावरून ठरते,त्यामुळे समृद्ध वाचन हेच लेखनात प्रगल्भता आणते,त्यामुळे लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी वाचन हे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक डॉ.अर्चना कुडतरकर यांनी केले.
येथील श्री.खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित लेखन कौशल्य विकसन कार्यशाळेत त्या बोलत होत्या.पुढे त्या म्हणाल्या की, ‘वाचनाबरोबरच प्रत्यक्ष सामाजिक अनुभव सुद्धा लेखनामध्ये तेवढेच महत्त्वाचे असतात. प्रासंगीक लेख, कथा, कादंबऱ्या लेखकांची वेगवेगळी लेखन शैली व्यक्ती परत्वे बदलते.शिक्षकी पेशामध्ये तर लेखन कौशल्य विकसित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे,कारण समाजातील एक सुज्ञ घटक म्हणून शिक्षकाकडे पाहिले जाते. आपल्यासमोरील पिढी घडवत असताना ही पिढी लेखन समृद्ध बनवण्याचे कार्य दररोज शिक्षकांच्या हातून घडले पाहिजे, तरच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘अभिव्यक्ती ‘ या घटकाचा विकास होईल व शिक्षणामध्ये अपेक्षित बदल घडतील.’
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230126-WA0293-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230126-WA0293-1024x682.jpg)
या कार्यशाळेमध्ये संकुलातील सर्वच शिक्षक प्राध्यापकांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच त्यांनी कार्यशाळेतील विविध कृतिंमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत दिलेल्या विषयावर कथा निर्मिती केली.
अध्यक्षीय समारोपात या कार्यशाळेचे अध्यक्ष श्री.बिपीन क्षीरसागर यांनी या कार्यशाळेचे शिक्षकांना असणारे महत्त्व सांगून एकूणच साहित्यामध्ये कुमारांसाठीच्या साहित्याची वानवा असून कुमार वयात योग्य दिशा देणारे कुमार साहित्य तयार व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, ‘ एक जबाबदार व अभिव्यक्त होणारा नागरिक घडविण्याचे कार्य भा.शि.प्र.संस्थेचे शिक्षक हे दररोजच करतात त्यामुळे या शिक्षकांच्या अभिव्यक्तीला लेखन कौशल्याची जोड देण्यासाठी ही कार्यशाळा असून प्रत्यक्ष समाजाला सुद्घा विविध माध्यमातून मार्गदर्शक असे लेखन संकूलातील शिक्षकांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230126-WA0295-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230126-WA0295-1024x682.jpg)
याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष श्री.विजय वालवडकर,कार्यवाह बिपीन क्षीरसागर, मार्गदर्शीका सौ. अर्चना कुडतरकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्री अप्पाराव यादव , सौ.वर्षा मुंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मुकुंद देवर्षी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री निवृत्ती दराडे सीबीएससी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा शिंदे तसेच सर्व शिक्षक,प्राध्यापक बंधू भगिनी कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन सौ.वर्षा मुंडे यांनी तर प्रस्ताविक श्री.श्रीकांत देशपांडे , वैयक्तिक पद्य श्री.शैलेश पुराणिक स्वागत व परिचय सौ.अनुराधा रांजणकर , उपस्थितांचे आभार डॉ.श्री.मुकुंद देवर्षी यांनी मानले. श्री.मंगेश मुळी यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.