समाजाशी रक्ताने नाते जोडण्याची प्रक्रिया रक्तदान शिबिरातुन साध्य होते; डॉ.सिध्देश्वर बिराजदार
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230127_221510-300x167.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230127_221510-300x167.jpg)
समाजाशी रक्ताने नाते जोडण्याची किमया रक्तदान शिबीरातून साध्य होते असे प्रतिपादन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील मेडीसिन विभाग प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांनी केले.
अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गणेश रूद्राक्ष मित्रमंडळ व कै.संदिप घाडगे यांच्या स्मृती प्रितर्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच गणेश रूद्राक्ष होते तर व्यासपीठावर माजी सरपंच शाहुराव बिडवे व मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ.सिद्धेश्वर बिराजदार म्हणाले की, समाजातील वृद्धांना त्यांच्या आजाराचे निदान व्हावे यासाठी स्वाराती रूग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून रूग्णांवर योग्य उपचार होतात. वृद्धांनी या कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.बिराजदार यांनी केले. रक्तदानाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा करणे हिच खरी राष्ट्रभक्ती व देशप्रेमाची भावना असल्याचे डॉ.बिराजदार यांनी सांगितले. यावेळी सरपंच गणेश रूद्राक्ष यांनी गावातील युवकांच्या पाठबळावरच हे रक्तदान शिबीर यशस्वी होत असल्याचे सांगितले. या रक्तदान शिबीरासाठी स्वाराती रूग्णालयातील रक्त पेढीच्या टिमने रक्तदानाची प्रक्रिया पुर्ण केली.