शिवराज्य अभिषेक सोहळ्यासाठी अंबाजोगाईचे ४तरुण रायगडकडे रवाना
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230531_204621-1024x471.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230531_204621-1024x471.jpg)
अंबाजोगाई येथील चार तरुण रायगड किल्ल्यावर होणाऱ्या आगामी शिवराज्य अभिषेक सोहळ्यास सायकलवर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रवाना झाले. शरद सूर्यवंशी, संतोष कदम, अतुल वखरे व बाळासाहेब लाखे अशी या तरुणांची नावे आहेत. त्यांचे हे दुसरे वर्ष आहे.
आज ते अंबाजोगाई येथून पू. अहिल्यादेवी होळकर चौक येथून पू. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास वंदन करून रायगडला रवाना झाले. ५५० किमीचे अंतर ५ दिवसात पूर्ण करून ते रायगडला पोहचतील. शिवराज्य अभिषेक सोहळ्यात सहभागी होवून ते परत येतील. केज, कुर्डुवाडी, पाटस, ढमालेवाडी व पाचाडला पोहचून ५ जूनला रायगडावर जातील.
यावेळी या सायकलस्वार यांना दगडू लोमटे, अड. जयसिंग चव्हाण, मनोज लोढा, विलास यादव, अण्णा रोहम , सदानंद वालेकर आदींनी शुभेच्छा देवून रवाना केले. हे तरुण निसर्ग प्रेमी असून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जंगले, नद्या, किल्ले व प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या आहेत. फोटोग्राफी, वृक्षारोपण, रक्तदान अशा उपक्रमात ते नेहमी सहभाग घेतात.