वाचाल तर वाचाल;शिकाल तर टिकाल! सत्यपाल महाराज


संत शिरोमणी गुरू रविदास व संत ककय्या महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सत्यपालची सत्यवानी हा समाजप्रबोधनपर कार्यक्रम संपन्न
राष्ट्रीय चर्मकार महासंघ अंबाजोगाईच्या वतीने आयोजित संत शिरोमणी गुरू रविदास व संत ककय्या महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यपाल ची सत्यवानी हा कार्यक्रम वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वाचाल तर वाचाल, आणि शिकाल तर टिकाल असे परखड मत सत्यपाल महाराज यांनी व्यक्त केले .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंजि एन डी शिंदे साहेब तर उद्घाटक म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजेश इंगोले, माजी न्यायमूर्ती तिडके, ऍड अनंत जगतकर, पूनम परदेशी,ऍड शिवाजी कांबळे जयंती उत्सव अध्यक्ष विनोद भुईटे उपस्थित होते.


या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि थोर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले . प्रास्ताविकात त्यांनी सदरील कार्यक्रम आयोजित करण्यामागची कारनमीमांसा विषद केली.
आपल्या समाजप्रबोधन पर कीर्तनात सत्यपाल महाराज यांनी विविध विषयांना हात घातला. उपस्थित जनसमुदयास मार्गदर्शन करताना महाराजानी अंधश्रध्दा व अंधविश्वास यांच्या पाठीमागे न लागता वास्तविकता पडताळून त्याकडे खुल्या नजरेने पाहण्याचे आवाहन केले . त्यासाठी त्यांनी महापुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासण्यासाठी वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल असा उपदेश उपस्थित जनसमुदयास दिला.


पुढे बोलताना सत्यपाल महाराज यांनी संत रविदास व संत ककय्या यांनी समाजवादी विचारांची पेरण केल्याचे सांगितले. तसेच आपणास निसर्गाने दिलेल्या बुद्धीचा पुरेपूर वापर करून वास्तविक गोष्टी आत्मसात करून त्यांवर काम करण्याचा मार्मिक सल्ला सत्यपालांनी दिला.उपस्थित महिलांना आपल्या जन्मदात्या आईची जन्मतारीख माहीत नसते मात्र माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री यांचे जन्मदिवस माहीत आहेत कारण त्या साऱ्या विश्वाच्या माता होत्या . अंधश्रद्धा व अंधविश्वास यांना बळी न जाता संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी यांचे विचार सदैव आपल्या आठवणीत ठेवून त्यावर आचरण करा. सर्व संतांनी व महापुरुषांनी माणसात देव पहिला ना की देवळातील मूर्त्यांत. तेव्हा माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचे आवाहन देखील सत्यपाल यांनी केले . देवदेवतांच्या नावावर मुक्या प्राण्यांचे बळी देऊ नका .रक्तदान करा, आईवडील यांची सेवा करा, परस्त्री कडे आई तथा बहिणीच्या दृष्टीने पहा असा मौलिक संदेश देखील सत्यपालांनी दिला .
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप इंजि.एन डी शिंदे यांनी केला . त्यानी गुरू रविदास व संत ककय्या यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. गुरू रविदास यांनी मन चंगा तो कटोथि मे गंगा उक्तीवर चालण्याचे आवाहन केल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच संत ककय्या यांनी सामाजिक मानवतेचा दृष्टिकोन बाळगण्यावर भर दिल्याचे देखील इंजि एन.डी. शिंदे साहेब यांनी स्पष्ट केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साळुंके यांनी केले तर उपस्तीत सर्वांचे आभार तालुका अध्यक्ष अमोल कांबळे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिपती( बप्पा) कांबळे, लिंबाजी खरटमोल, गोविंद खरटमोल , जयसिंग कांबळे,बालाजी परदेशी,अशोक कांबळे, ज्योतिराम बनसोडे, आदींनी परिश्रम घेतले.