ठळक बातम्या
रस्ता व आरोग्य सुविधेसाठी युवकांचे मोबाईल टावरवर फिल्म स्टाइल आंदोलन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_140227-596x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_140227-596x1024.jpg)
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील एका युवकाने गावातला रस्ता दुरुस्त करावा यासह दवाखान्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध करून द्यावे यासाठी चक्क मोबाईल टॉवर वर चढून आंदोलन सुरू केले आहे.
बीड येथील बाले पीर भागातील एका मोबाईल टॉवरवर चढून वाहिरा तालुका आष्टी येथील अशोक शिवाजी माने या युवकांनी आंदोलन सुरू केले आहे. वाहिरा गावातील दवाखान्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर वाहिरा ते धानोरा या रस्त्याचे काम करावे या मागणीसाठी या युवकाने मोबाईलवर चढून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी या मोबाईल टॉवर कडे धाव घेतली आहे. वाहिरा येथील झांजे वस्ती, तरटे वस्ती धानोरा ते वाहिरा अशा प्रकारच्या रस्त्याची कामे करावी या मागणीसाठी या युवकांनी हे आंदोलन सुरू केले आहे.