अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेश गुंडप्पा कापसे यांचे -हदयगती थांबल्याने वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले.
रमेश गुंडप्पा कापसे हे किनगाव ता. अहमदपुर जवळील अदनुर या गावचे मुळ रहिवासी. त्यांचे वडील काही कारणानिमित्ताने अंबाजोगाई येथे राहण्यासाठी आले आणि येथेच स्थायिक झाले.
रमेश कापसे हे कमी वयातच व्यवसायात शिरले. खारमुरी विकण्याच्या साध्या गाड्या पासून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. पुढे काही वर्षे त्यांनी हॉटेल व्यवसाय ही केला. या दोन्ही व्यवसायात आपले नांव कमावल्या नंतर त्यांनी मोंढा विभागातील मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरु केला आणि या व्यवसायात ते स्थिरावले.
रमेश कापसे हे व्यसायासोबतच धार्मिक कार्यात ही सदैव अग्रेसर असत. गजानन महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाची आणि त्यानंतर सकाळच्या महापुजा व महाप्रसादाची जबाबदारी गेली अनेक वर्षांपासून ते स्वतः सांभाळत असत. शेगाव येथील गजानन महाराजांचे ते निस्सिम भक्त होते. अलिकडे दोन दिवसांपुर्वी कपीलधार येथे गजानन महाराजांची पालखी मुक्कामी होती त्यावेळी ते आपल्या मित्रांसोबत दर्शनासाठी गेले होते.
गेली दोन दिवसांपासून त्यांनी छाती दुखत असल्याचे आपल्या मित्रांना सांगितले होते. मित्रांनी उपचारासाठी त्यांना आग्रह केला मात्र आपल्याला काहीही होत नाही या भुमिकेवर ठाम होते. मित्रांनी त्यांना उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले मात्र काळाने त्यांच्यावर बरोबर घाव घातला आणि एकामागून एक असे दोन ऍटॅक येवून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज सकाळी त्यांचे पार्थिवावर माकेगाव येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मित्र परिवार व आप्तेष्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रमेश कापसे यांच्या अकाली निधनामुळे अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.