योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीतुन डॉ. सुरेश खुरसाळे निवृत्त
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/04/img_20240410_175729809010425897093121-300x214.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/04/img_20240410_175729809010425897093121-300x214.jpg)
ऍड. शिवाजीराव कराड पॅनलच्या बाहेर; १० नव्या चेह-यांना मिळणार संधी
१२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आली असतांनाच संचालक मंडळाच्या या निवडणुकीतुन विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी सन्मानाने माघार घेतली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत आपल्या घरातील कोणाचेही नाव त्यांनी नवीन संचालक संचालक मंडळात येवू दीले नाही. मात्र गेली अनेक वर्षांपासून संस्थेचे सतत उपाध्यक्ष राहीलेले ऍड. शिवाजीराव कराड यांचे नाव नव्या संचालक मंडळातुन बाहेर काढण्यात आल्याची माहिती हाती लागली आहे.
अंबाजोगाई शहराची शैक्षणिक शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीने हा महिना चांगलाच गाजला. संस्थेच्या नवीन संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १२ एप्रिल ही शेवटची तारीख असल्याने या नव्या संचालक मंडळात कोणा कोणाचा समावेश राहील याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/04/img_20240410_1332566611258741249938985-772x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/04/img_20240410_1332566611258741249938985-772x1024.jpg)
या निवडणुकीसाठी विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक पॅनल तयार झाला नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल हे आठ दिवसांपुर्वीच निश्चित झाले होते. मात्र विद्यमान संचालक मंडळात कोणाकोणाचा नंबर लागेल याबाबतची अधिक स्पष्टता होत नव्हती. तीन दिवसांपुर्वी विद्यमान संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत सलग तीन वेळा अध्यक्ष राहिलेल्या डॉ. सुरेश खुरसाळे यांनी या निवडणुकीतुन आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले व ते आपल्या मतावर ठाम राहिले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या घरातील एका ही सदस्याचे या नव्या पॅनलमध्ये येवू दिले नाही.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/04/img_20240410_1332277402550240068184563-253x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/04/img_20240410_1332277402550240068184563-253x300.jpg)
माध्यम न्यूज नेटवर्क ला हाती लागलेल्या माहिती नुसार विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी या निवडणुकीतुन माघार घेतली असल्याची माहिती आहे, शिवाय गेली अनेक वर्षे उपाध्यक्ष असलेल्या ऍड. शिवाजीराव कराड आणि ऍड. व्हि. के. चौसाळकर यांची नांवे संचालक मंडळाच्या यादीतून डावलण्यात आली आहेत. ऍड. व्हि. के. चौसाळकर यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र ऍड. जीवन चौसाळकर यांना संधी देण्यात आली असल्याची माहिती आहे मात्र ऍड. शिवाजीराव कराड यांच्या घरातील कोणालाही संधी देण्यात आली नाही.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/04/img_20240410_1333328549590695812680399-1024x1015.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/04/img_20240410_1333328549590695812680399-1024x1015.jpg)
नव्याने होणा-या संचालक मंडळात लंकेश वेडे, रमण सोनवळकर, अंगद कराड, प्रा. अभिजित लोहिया, पाशुमिया गुरुजी, इंजि. प्रताप पवार, प्रा. श्रीमती जयश्री देशपांडे (मोटेगावकर), ऍड. वैशाली विर्धे आणि या पुर्वीच्या संचालक मंडळात स्विकृत सदस्य म्हणून असलेले डॉ. शैलेश वैद्य आणि बर्दापूरकर या दहा नव्या चेह-यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या नवीन संचालक मंडळाच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळांनी डॉ . सुरेश खुरसाळे यांच्या कडे आपणच अध्यक्ष व्हावे असा आग्रह धरलाय, मात्र डॉ. खुरसाळे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या नंतर या निवडणुकीचा सर्व पॅनल (पदाधिकारी यांच्या सह)विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी जाहीर करावा, संचालक मंडळ व पदाधिकारी ही जाहीर करावे अशा प्रकारची विनंती त्यांनी केली या नंतर या संभाव्य नव्या पॅनलची निर्मिती विद्यमान उपाध्यक्ष ऍड. शिवाजीराव कराड यांचे नाव वगळुन सर्व समावेशक पॅनल जाहीर करण्यात आले असल्याची माहिती योगेश्वरी च्या सभासदांनी दिली आहे.