योगेश्वरी मेडिकल विभागाच्या स्नेहसंमेलनास मान्यवरांची हजेरी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230129_155623-1024x571.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230129_155623-1024x571.jpg)
येथील मेडिकल कॉलेज परीसरातील योगेश्वरी नुतन विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेह संमेलनात मान्यवरांनी हजेरी लावून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अलीकडे शाळा महाविद्यालयात खेळ स्नेहसंमेलने घेण्याची मानसिकता शिक्षकांत राहिलीच नाही विद्यार्थी सुद्धा उदासीन असतात मोबाईल गेमने सर्वांना वेड लावले अशाही काळात तीन दिवसाचा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मेडिकल परिसरातील कै दे बा ग योगेश्वरी नूतन प्राथमिक विभाग मेडिकल परिसराचे विभाग प्रमुख रवींद्र ठाकूर, संमेलन प्रमुख कल्पना यन्नावार सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून घेण्यात आले होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230129_155639-1024x432.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230129_155639-1024x432.jpg)
पहिल्या दिवशी अंबाजोगाई शहरातील लघु उद्योजक व पालक पवार व परदेशी यांच्या हस्ते आनंद नगरीचे उद्घाटन करण्यात आले अनेक माता पालक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ बनवून त्याचे स्टॉल लावण्यात आले होते दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला संस्था सहसचिव श्रीमती गोस्वामी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती दिवाने मॅडम शासकीय रुग्णालयातील विभाग प्रमुख डॉ नितीन चाटे, महादेवजी खोटे इत्यादी मान्यवर हजर होते मान्यवरासमोर विद्यार्थ्यांनी आपले विविध खेळ सादर केले व मुलाचे मान्यवरांनी तोंड भरून कौतुकही केले. खोटे यांनी शाळेसाठी भेट स्वरूपात काही रक्कम देऊ केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230129_155655-1024x450.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230129_155655-1024x450.jpg)
तिसऱ्या दिवशी एकूणविद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यातआला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ खुरसाले, जिल्हा शिक्षणाधिकारी कुलकर्णी डॉ अनिल मस्के संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष डॉ खुरसाले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती स्पर्धेतील सहभाग तसेच मिळविलेले यश याचे कौतुक केले डॉ अनिल मस्के यांनीही मुलांना मार्गदर्शन केले याप्रसंगी जिल्हाशिक्षणाधिकारी श्री कुलकर्णी यांनी मुलांना सतराचा पाढा म्हणावयास लावून पालक विद्यार्थी यांच्या विविध जबाबदाऱ्यांची आठवण करून देत विविध किस्से सांगितले पालक संतोष चव्हाण यांनी शाळेस आर्थिक सहकार्य केले.
यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक नांदगावकर संमेलन प्रमुख यन्नावार शिक्षक प्रतिनिधी आखाडे, जोशी विद्यार्थी प्रतिनिधी आजगुंडे, उजगरे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मुंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.