महाराष्ट्र
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्या (२५ नोव्हेंबर) ला उद्घघाटन
तुषार गांधी, सिनेअभिनेते किरण मोरे मान्यवरांची उपस्थिती
२५-२६ आणि२७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाला आज होणार सुरुवात होणार असून या समारोहाचे उद्घघाटन गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते आणि प्रख्यात सिनेअभिनेते, निर्माते किरण मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला आणि स्मृती ला उजाळा देण्यासाठी ३९ वर्षापुर्वी सुरु करण्यात आलेल्या व दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ४० वे वर्ष असून २५-२६ आणि २७ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. चार दशकपूर्ण केलेल्या या तीन दिवसीय समारोहाचे. उद्घाटन आज २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून या तीन दिवसीय समारोहात कवी संमेलन, चित्रकला स्पर्धा, बालआनंद मेळावा, कृषी परिषद, सुफी व गजल गायन शास्त्रीय संगीत सभा, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण, समारोप समारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अंबाजोगाईत गेल्या ३९ वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने वैविध्यपुर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात. अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो.
या तीन दिवसीय समारोहाचे उद्घघाटन सोमवार, दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. प्रख्यात गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार अरुण गांधी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून सुप्रसिद्ध अभिनेते व सिनेमा, मालिका निर्माते किरण माने हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
▪️ रात्री कवी संमेलनाचे आयोजन
रात्रौ ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी ठाणे येथील ज्येष्ठ कवियत्री डॉ. प्रज्ञा दया पवार ह्या राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अकोला येथील सुप्रसिद्ध कवी गझलकार गोपाळ मापारी हे करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी डॉ. वृषाली किन्हाळकर – नांदेड, प्रा. सिसिलिया कार्व्हालो – वसई, संगिता बर्वे – पुणे, संजय चौधरी – नाशिक, बालाजी मदन इंगळे- उमरगा, रमजान मुल्ला- सांगली, जयंत चावरे – यवतमाळ, पूजा भडांगे – बेळगाव, सुनिती लिमये – पुणे, बालाजी सुतार – वर्धा (अंबाजोगाई), नारायण पुरी- छ्त्रपती संभाजीनगर, नितीन वरणकार – शेगांव व संजय आघाव – परळी यांचा सहभाग राहणार आहे.
