मांजरा प्रकल्पावरील जागतिक जलपर्यटन केंद्रास पर्यटन विभागाच्या हिरवा कंदील!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230420_102053.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230420_102053.jpg)
कृती आराखडा सादर करण्याचे आदेश!
बीड-लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा मध्यम प्रकल्पावर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन केंद्रास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हिरवा कंदील दाखवला असून सदरील प्रकल्प विकसित करण्यासंदर्भात सर्वेक्षण आराखडा सादर करण्याचे आदेश या विभागाने दिले आहेत.
या संदर्भात महाराष्ट्र जलपर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम या कार्यालयाचे वरीष्ठ व्यवस्थापक, जलपर्यटन यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशात या कार्यालयास प्राप्त झालेल्या मपविम/जलपर्यटन/मांजरा प्रकल्प/अ-३६८/२०२३ दि.२६ मार्च २०२३ चे पत्र व आ. नमिता अक्षय मुंदडा यांचे पत्र जा.क्र.८६१/२०२३ दि. ९ मार्च २०२३ या दोन्ही पत्रांचा संदर्भ देत पुढे असे म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भाकित मा. नमिता अक्षय मुंदडा, विधानसभा सदस्य यांचे पत्रान्वये धनेगाव, ता. केज, जि. बीड येथील मांजरा प्रकल्प येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याकरीता सर्वेक्षण आराखडा तयार करणेबाबत मा. जिल्हाधिकारी, बीड यांना निदेश देणेबाबत कळविले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230420_102135.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230420_102135.jpg)
सबब, धनेगाव, ता. केज, जि. बीड येथील मांजरा प्रकल्प येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करणेबाबत सर्वेक्षण आराखडा तयार करण्याकरिता आपल्या स्तरावरून मा. व्यवस्थापकीय संचालक, म.प.वि.म., मुंबई यांना प्रस्ताव सादर करण्यात यावा, ही विनंती. जेणेकरुन, याबाबत पुढील कार्यवाही करणे शक्य होईल.
सदरील पत्रावर वरिष्ठ व्यवस्थापक (जल पर्यटन) म.प.वि.म., मुंबई. यांची स्वाक्षरी आहे.
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image2056876541-1683112408600.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image2056876541-1683112408600.jpg)
केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र व्हावे ही या विभागाच्या लोकनेत्या स्व.डॉ. विमल मुंदडा यांची मागणी होती. या मागणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा ही केला होता. मात्र त्यांच्या अकाली निधनाने ही मागणी मागे पडली होती. आता त्यांच्या स्नुषा आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी या विभागाचे लोकप्रतिनिधीत्व करीत असतांनाच ही मागणी पुढे रेटली, सातत्याने या मागणीच्या पुर्ततेसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला, तेंव्हा ही मागणी आता पुर्णत्वाकडे जात आहे. आ. नमिता मुंदडा यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश येत आहे याचा आनंद मतदारसंघात व्यक्त करण्यात येत आहे.