महात्मा फुले जन आरोग्य योजनेत स्वाराती पाचव्यांदा मराठवाड्यात अव्वल
योजना प्रमुख डॉ. नितीन चाटे यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव!
केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत -महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सरलेल्या वर्षात मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे.
मराठवाड्यातील चार पैकी तीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये महानगरपालिका क्षेत्रात असुनही त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सदरील योजनेची अंमलबजावणी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाल्याचे आकडेवारी वरुन वारंवार दिसुन आले आहे.
सदरील योजनेअंतर्गत २०२३ या वर्षी स्वाराती रुग्णालयाने सहा हजाराहून अधीक रुग्णांना ऊपचार दिल्याने शासनास दहा कोटी रुपयांहुन अधिक महसूल प्राप्त झाला आहे .
अशी आहे क्रमवारी
स्वामी रामानंद तिर्थ ग्रा.शा.वै.म. अंबाजोगाई
6013 रुग्ण (10 कोटी 21 लाख रु)
विलासराव देशमुख शा. वै. म.,लातुर
3456 रुग्ण ( 6 कोटी 52 लाख रु)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,छ.संभाजीनगर
3203 रुग्ण ( 7 कोटी 40 लाख रु)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड
2435 रुग्ण (4 कोटी 15 लाख रु)
सर्जरी विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे यांनी योजनेचे प्रभारी म्हणून काम करताना गत पाच वर्षांत सतत मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक मिळवून दिला आहे .
या पाच वर्षांत स्वामी रामानंद तीर्थ शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाने तब्बल 27 हजार हुन अधिक रुग्णांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवून दिला असुन त्यातून शासनाकडे 51 कोटी रुपयांहून अधिक विमा रक्कम जमा झाली आहे.
याबाबत अधिक माहीती देताना अधिष्ठाता भास्कर खैरे यांनी सांगीतले की महाविद्यालयातील सात चिकीत्सालयीन विभागांना या योजनेअंतर्गत कार्य करावे लागत असुन सर्जरी विभागाच्या भरीव योगदानामुळे या ही वर्षी मराठवाड्यात अव्वल क्रमांक कायम राखता आला तसेच राज्यस्तरीय रॅंकींग मध्येही स्वाराती चे नाव प्रथम क्रमांकावर गेल्याचा बहुमान 2023 साली प्राप्त झाला आहे.
सदरील योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मेडीसीन, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, इएनटी या चिकीत्सालयीन विभागांसह पॅथॉलॉजी, बायोकेमीस्ट्री ,रेडीऑलॉजी ,ॲनेस्थेशिया या विभागांचेही मोठे सहकार्य लाभल्याचे व त्यासाठी सर्व स्टाफ नर्स , निवासी डॉक्टर्स व डाटा एंट्री ऑपरेटर यांनी मोठे परिश्रम केल्याचे डॉ.नितीन चाटे यांनी नमुद केले.
योजना अंमलबजावणी च्या आमच्या पॅटर्न चा अभ्यास करण्यासाठी विवीध शासकीय महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासह प्रत्यक्ष भेटी देऊन ही प्रेरीत करत असल्याचे डॉ.नितीन चाटे यांनी सांगीतले.