राष्ट्रीय

भारतजोडो यात्रेतील मुक्कामात राहुल गांधी आणि सहका-यांसाठी मराठवाडी आणि वैदर्भिय मेनू निश्चित!

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी जम्मु काश्मीर पर्यंतचा भाग पादिक्रांत करीत निघालेली पदयात्रा आता ७ नोव्हेंबर पासून १४ दिवस महाराष्ट्रात मुक्कामाला असणार असुन या दौऱ्यात सहभागी असलेल्या राहुल गांधी आणि त्यांच्या सर्वच सहका-यांना मराठवाडी आणि वैदर्भिय पौष्टिक अन्नाचे जेवण देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान नांदेड आणि वाशिम येथील जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेस कमेटीने आपली कंबर कसली आहे.
दक्षीण भारतातुन अत्यंत यशस्वी आणि सामान्य लोकांचा उत्स्फूर्त सहभागाचा उत्साह घेवून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातुन महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांसह सामान्य कॉंग्रेस कार्यकर्ते आणि कॉंग्रेस प्रेमी मंडळीत प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही पदयात्रा महाराष्ट्रात १४ दिवसांचा मुक्काम करणार असून नांदेड आणि वाशिम येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना किमान पाच ते सहा लोकांचा सहभाग राहील अशा पध्दतीचे नियोजन प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.


राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडतो पदयात्रेचा लावाजमा खुप मोठा आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील यात्रेचा मार्ग, मुक्काम, कार्यकर्त्यां सोबतच्या त्यांच्या बैठका, समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी, भेटी साठी येणाऱ्या लोकांची सुक्ष्म तपासणी या सर्व बाबींची तयारी भारत जोडायात्रा निघण्यापुर्वीच दिल्लीहुन निश्चित करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे प्रवेश करीत ही यात्रा पुढे वाशीम, अकोला मार्गे पुढे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली या पदयात्रेतील लोकांना सकस व पौष्टिक जेवन मिळावे यासाठी विशेष आरोग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडी आणि वैदर्भिय पध्दतीच्या जेवनातील सृपेशल मेनुंची निवड करण्यात आली आहे. सकाळी नाष्टा, दुपारी जेवून आणि सायंकाळी हलकासा आहार अथवा फळे असा आहार असणार आहे. मराठवाड्यातील मुक्कामात खास करून दही-धपाटे, थालीपीठ, भात वरण, बाजरीची भाकरी पिठलं यांचा समावेश असेल तर विर्दभ भागात खान्देशातील शेवभाजी, वांग्याचं भरीत व इतर पदार्थांचा समावेश असेल. या संपुर्ण जेवणाची व्यवस्था नांदेड येथील अनुभवी केटरर दगडु पुरोहीत यांच्या वर सोपविण्यात आली आहे.
पदयात्रेत सहभागी झालेले राहुल गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी हे दररोज किमान २५ ते ३० किमी चे अंतर पायी चालत आहेत. त्यामुळे या सर्व पदयात्रींमध्ये शारिरीक उर्जा निर्माण करणारे पौष्टिक आणि सकस आहार देण्याचा संयोजक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जेवणासोबत प्रथिनेयुक्त पिष्टमय पदार्थांचा समावेश असणार आहे.

▪️तेलंगणात वेगळे पहायला मिळाले
चित्र
जडचेर्ला (तेलंगण) :
महाराष्ट्रात ही पदयात्रा येण्यापुर्वी तेलंगणा राज्यातील जडचेर्ला या गावी
भारत जोडो पदयात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे स्थानिक युवक-युवती, नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांच्या उपक्रमातही सहभागी होत असतांनाच दिसले. यावेळी रविवारी सकाळी राहुल गांधी यांनी पदयात्रेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना त्यांना धावण्यास प्रवृत्त केले. सुरक्षेची पर्वा न करता त्यांनी अचानक धावण्यास सुरवात केली असता त्यांच्यासमवेत मुले, पक्षाचे पदाधिकारीही धावले. दरम्यान, राहुल गांधी यांनी स्थानिक पारंपरिक नृत्यात सहभाग घेतला. तेलंगणात आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा पाचवा दिवस होता. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसमवेत आज सकाळी जडचेर्ला येथून पदयात्रा सुरू केली. दिवसभरात पदयात्रेने १५ ते २० किलोमीटर अंतर पार केले. काल पदयात्रेने २० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केले. राहुल गांधी यांची पदयात्रा तेलंगणातील सात लोकसभा आणि १९ विधानसभा क्षेत्रातून जात सुमारे ३७५ किलोमीटरचे अंतर कापणार आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात पदयात्रा प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी चार नोव्हेंबर रोजी पदयात्रा एक दिवस विश्रांती करणार आहे.
▪️मान्यवरांशी साधणार संवाद!
एलंगणातील पदयात्रेत वायनाडचे खासदार राहुल गांधी हे तेलंगणातील पदयात्रे दरम्यान क्रीडा, व्यापारी आणि मनोरंजन क्षेत्रातील नामांकित व्यक्तींबरोबरच विविध समुदायातील प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. तसेच ते तेलंगणातील मंदिर, मशीद, प्रार्थनास्थळाला भेट देऊन तेथे पूजा करणार आहेत. भारत जोडो पदयात्रा सात सप्टेंबर रोजी तमिळनाडूच्या कन्याकुमारी येथून सुरू झाली. तेलंगण प्रदेश काँग्रेसने पदयात्रेच्या समन्वयासाठी दहा विशेष समित्या तयार केल्या आहेत.राहुल गांधी यांचा पारंपरिक नृत्यात सहभाग जडचेर्ला येथे शालेय मुलांना आज सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी भेटले. त्यांच्याशी बोलताना अचानक त्यांनी धावण्यास सुरवात केली. त्यामुळे त्यांच्यासमवेत पदाधिकाऱ्यांना देखील पळावे लागले. वेगाने धावणारे राहुल गांधी यांनी सुरक्षा रक्षक आणि तेलंगण काँग्रेसच्या अध्यक्षांना मागे टाकले. एवढेच नाही तर लहान मुले देखील त्यांना गाठू शकले नाहीत. त्यानंतर राहुल गांधी हे गोलापल्ली येथे पोचले. तेथे त्यांनी स्थानिक महिलांसमवेत बथुकम्मा नृत्य केले. आजच्या पदयात्रेत आणि उपक्रमात माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश सहभागी झाले होते. बथुकम्मा उत्सव हा तेलंगणातील महिलांचा स्थानिक उत्सव आहे. महिलांच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जातो.

▪️१८ नोव्हेंबर रोजी शेगावात सभा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा सुरू असून ही यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे 18 नोव्हेंबर रोजी ही यात्रा येणार असून शेगावात याची दिवशी सायंकाळी राहुल गांधी यांची जंगी सभा होणार आहे. सभेच्या व यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हंडोरे , यशोमती ठाकूर अशा बड्या नेत्यांसह अनेक नेते शेगावात तळ ठोकून यात्रेच व सभेच नियोजन करताना दिसून येत आहेत.
▪️ शरद पवार उध्दव ठाकरे यांची उपस्थिती?
बुलढाणा जिल्ह्यात ही पदयात्रा तीन दिवस असणार आहे. त्यामुळे सभेच्या नियोजनासाठी सभास्थळाची पाहणी करणे , आगमन व निर्गमन रस्त्यांची पाहणी करणे यासाठी राहुल गांधींच्या पदायात्रे आधीच या नेत्यांची पदयात्रा शेगाव परिसरात दिसत आहे. या यात्रेला जवळपास सहा लाख लोकं येणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
▪️ प्रचंड उत्सुकता!
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ३,७५१ किमी अंतर पार करुन देशाला एकजुट करण्याच्या उद्देशाने निघालेल्या या भारत जोडो यात्रेबध्दल महाराष्ट्रातील सामान्य लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या यात्रेचे महाराष्ट्रात अभुतपुर्व स्वागत होईल आणि सामान्य लोकांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker