देशव्यापी संपात सहभागी झालेल्या येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शुक्रवारी (दि.१०) सलग दुसऱ्या दिवशीही बँकेच्या शाखेसमोर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली.
युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन या संघटनेतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे. रिक्त जागा भरतीच्या मागण्यासाठी या बॅंकेचे अधिकारी व कर्मचारी गुरुवारपासून दोन दिवसीय संपावर गेले आहेत.
घोषणाबाजी करीत केली निदर्शने
आमच्या मागण्या मान्य करा, युनायटेड फोरम जिंदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी करून येथील महाराष्ट्र बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. त्यात बँकेतील कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचारीही सहभागी झाले होते. यावेळी युनायटेड फोरमचा संप कशासाठी आहे. याची जनजागृती करणारी पत्रकेही त्यांनी लोकांना वाटली.
रीक्त जागी नवीन कर्मचारी भरतीकरा
मागील अनेक वर्षापासून विविध कारणांनी बँकेत रिकाम्या झालेल्या जागाही व्यवस्थापनाने भरल्या नाहीत. ही पुरेशी नोकर भरती न झाल्यामुळे आणि तंत्रज्ञान तसेच पर्यायी व्यवस्थेच्या मर्यादेमुळे ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा विपरीत परिणाम बँकेच्या व्यवसायावर आणि कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर होत आहे. युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन अंतर्गत महा बॅंकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी संघटना गेल्या अनेक महिन्यापासून नोकर भरतीच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करीत आहे. विविध स्तरावर निवेदने देऊन निदर्शनासारखी आंदोलने केली. मात्र बँक व्यवस्थापनाने संघटनेच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.