बीड जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन पाच तारखेच्या आत करा; आ. मुंदडा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221216_134949.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221216_134949.jpg)
महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा प्रमाणे बीड जिल्हयातील शिक्षकांचे वेतन, वेतन प्रणाली द्वारे दर महिन्याच्या ०५ तारखेच्या आत करा अशी मागणी आ.नमीता अक्षय मुंदडा यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या कडे केली आहे.
या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांचे मासीक वेतन वेळेवर प्राप्त होते. परंतु बीड जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सर्व शिक्षकाचे वेतन ५ तारखेच्या आत होत नसल्याने शिक्षक, दिव्यांग कर्मचारी यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शासन निर्णया प्रमाणे व महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा प्रमाणे बीड जिल्हयातील जि.प. शिक्षकांचे वेतन, वेतन प्रणाली द्वारे दर महिन्याच्या ०५ तारखेच्या आत करणेबाबत शिक्षकांमधून मोठ्याप्रमाणात मागणी होत आहे.
तरी बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या होत असलेल्या मागणी नुसार व शासन निर्णया प्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा प्रमाणे बीड जिल्हयातील जि.प. शिक्षकांचे वेतन, वेतन प्रणाली द्वारे दर महिन्याच्या ०५ तारखेच्या आत करणेबाबत संबंधिताना आदेश द्यावेत अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.