लातूरठळक बातम्या
बालब्रह्मचारी भीमाशंकर स्वामी महाराज यांचे निधन


वडवळ नागनाथ: वडवळ नागनाथ येथील बालब्रह्मचारी माहेश्वरमुर्ति शि.भ.प.भीमाशंकर स्वामी- बनवसकर महाराज (वय ३४) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दिं.१३) रात्री मुंबई येथील जे.जे.हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दिं.१४) सायंकाळी येथील “बेलपत्री” स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीरशैव संप्रदायातील अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार यांनी भावांजली वहिली. अंतविधीस शिष्यगण, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिव संप्रदायातील धर्मप्रचारक असलेले कै. स्वामी हे बालपणापासूनच महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाना प्रदेशातील अनेक धार्मिक कार्यक्रमात त्यांचे शिवकिर्तन गाजली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पाच वर्षापूर्वी महाराष्ट्र वीरशैव समाजाने त्यांना “समाज भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.