Uncategorizedमहाराष्ट्र

” पावसाचा लहरीपणा वाढलाय…! ” हे खरे आहे का?

मागील दहा वर्षांपासून पावसाचा लहरीपणा वाढल्याचे आपण पहातो आहोत. पुर्वी मृग नक्षत्राला (७ जून) हजेरी लावणारा पावून अलिकडे जुलै उजाडल्या शिवाय हजेरी लावत नाही. पुर्वी तीन तीन दिवस संततधार कोसळणारा पाऊस तर जवळपास गायबच झाल्यात जमा आहे. आता पाऊस पुर्वी सारखा पडतच नाही, पडला तर एकाच ठिकाणी आणि तो ही जोराचा पडतो, त्यात नियमितता, सातत्य राहिलेच नाही अशा चर्चा अलिकडे महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात अलिकडे ऐकावयास मिळतात. किती तथ्य आहे या चर्चेत? पाऊसाचा लहरीपणा खरचं वाढलाय का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहेत.
अलिकडील काही वर्षांत राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याच्या, अतिवृष्टीमुळे महापुर आल्याच्या, नदी नाल्यांचे प्रवाह बदलुन शेत पीकांचे नव्हे तर शेत जमिनीचे ही नुकसान झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याचे पाहतो. एकीकडे या घटना घडत असतांनाच राज्यातील अनेक भागात पावसाचा एक टिपुस ही न पडल्याचे अनेक तालुके पहातो. एका विभागात पावसामुळे नदी, नाले, विहिरी टंब भरल्याचे चित्र तर दुसरीकडे पावसाअभावी पीके वाळत चालल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळते. हे सर्व पावसाच्या लहरी पणामुळेच घडते. पावसाचा हा लहरीपणा का वाढला आहे हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. पावसाच्या या लहरीपणाचा कारणमिमांसा करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
फार मागे नाही पाच सहा वर्षांपूर्वी… २०१७ साली जुलै महिन्यात मुंबई महानगर पाण्यामध्ये बुडलेलं असतांनाच मराठवाडा मात्र पावसाची वाट पहात उभा होता. पुणे, मुंबई, कोकण, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस धो धो कोसळत असताना मराठवाड्याच्या मात्र फक्त वाहुन जाणारी ढग पाहण्याचेच नशीबी आले होते. पावसाचा हा लहरीपणा का? कधी बराच काळ पाऊसच नाही तर कधी एका रात्रीतच धो धो पाऊस! पाणीच पाणी!असे का?
पावसाचा हा लहरीपणा अलिकडेच वाढलाय का? तर नाही. तसं असतं तर पावसाचा लहरीपणा सांगणा-या “हाकंव पेंडी आन् बोंबंव खंडी” अशा ग्रामीण म्हणी तयारच झाल्या नसत्या.


पावसाचे अभ्यासक या संदर्भात काय म्हणतात ते पाहणं ही महत्त्वाच आहे. “पावसाचं एकुण प्रमाण पाहिलं तर गेल्या १००-१२५ वर्षात त्यात काही बदल झाला आहे, असे दिसत नाही. थोडा फार बदल झाला, पण तो हवामानात होणा-या नैसर्गिक चढ उतारावर किंवा पावसाच्या नोंदी घेण्यात आलं त्रुटींवर दाखवावा लागेल. मुंबई, महाबळेश्वर, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भ यांच्या पर्जन्यमानात गेल्या १०० वर्षात फारसा बदल झाला नाही. यावर तज्ञांचा भरपुर अभ्यास झाला आहे. अनेक तज्ञांनी या संदर्भात वेगवेगळी आकडेमोड देखील केली आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटते? याला फारसा अर्थ राहत नाही.” असे पावसाचे अभ्यासक सांगतात.
अर्थात पावसाचा लहरीपणा वाढलाय आहे हे म्हणणं अगदीच चुकीचे आहे असे अजिबात नाही. एका बाजूने पावसाचे अभ्यासक हे म्हणणे खोटं ठरवत असले तरी पावसाची आकडेवारी वेगळ्या पद्धतीने मांडली की, पावसाचा लहरीपणा वाढलाय हे म्हणणे एकदम खरे ठरतेय. पावूस पडण्याचं चार महिन्यातील प्रमाण कसं आहे याचा अभ्यास केला की पावसाचा लहरीपणा वाढलाय हे म्हणणे खरे वाटतेय. मागील दहा वर्षात पावसाचं वितरण असमान झाले आहे. म्हणजे पावूस पुर्वी सारखा सतत अधुम मधुन न पडता आता तो थोडं.याच वेळात जास्तीचा पाऊस पडतो आहे. म्हणजे पुर्वीसारखा संतत धार न बरसता तो एकदाच धोधो बरसून अचानक गायब होवून जातो आहे. पावूस कमी कालावधीत पडतो, पण सरासरी भरुन काढतो! असे ते चित्र आहे. अशा पावसामुळे शासकीय कागदावरील आकडेवारी बरोबर दिसते, मात्र प्रत्यक्षात त्यांचे परिणाम बरोबर दिसत नाहीत. पावसाच्या या लहरीपणामुळे मग कधी पावसाअभावी पीके वाळलेली पहावयास मिळतात तर कधी जास्तीचा पावूस पडल्यामुळे पीके पाण्याखाली गेलेली पहावयास मिळतात!


मागील दहा बारा वर्षांच्या कालावधीत पावसाकडे वस्तुनिष्ठपणे पाहीले तर पावसाच्या लहरीपणात बदल झालेला निश्चित पुणे आपणास दिसेल. या संदर्भात भारतीय उष्ण प्रदेशीय हवामान शास्त्र संस्था (आय आय टी एम) आणि भारतीय हवामान विभाग (आय एम डी) यांनी पावसाच्या लहरीपणा संदर्भात केलेल्या अभ्यासाचा संदर्भ पाहिला तर त्यांनी “अलिकडे मान्सून ची सुरुवात वेळेवर होते, पण त्यानंतर सातत्याने पडणाऱ्या पावसात आता मोठे खंड पडू लागले आहेत” असे सुचक मत व्यक्त केले आहे.
पावसाच्या लहरीपणाचा विचार करतांना आणि हवामानाचा विचार मांडताना एक विशिष्ट मर्यादा लक्षात घ्यायला हवी असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ती मर्यादा आहे कालखंडाची! “टाइमस्केल” असं सुटसुटीत नांव या मर्यादेला आहे!
सामान्यतः आपण माणूस म्हणून या संदर्भात आपलं मत व्यक्त करताना माणसाच्या काखंडाचा, ह्युमन टाइमस्केलचा विचार करतो. त्यामुळे मागील दहावीस वर्षात पावसाच्या लहरीपणात काय बदल झाले यावर आपली गणितं आपण ठरवतो! पण पावसाच्या लहरीपणाचं, हवामानाचं टाइमस्केल किमान काही शतकांच आहे. तिथं आपला दहा वीस वर्षांचा अनुभव फारच तुटका ठरतो. म्हणूनच पावसाच्या लहरीपणा बाबत, हवामानाच्या बाबतीत आपल्या तोकड्या अनुभवांवर काही बोलायला गेलं तर आपला अंदाज सपशेल चुकीचा ठरतो. अलिकडेच जन्माला आलेल्या हवामान तज्ञांचे अंदाज याचमुळे चुकीचे ठरते असावेत! हवामानातील होणारे बदल नाकारता येणारे नाहीतच. म्हणून पावसाच्या लहरीपणा बाबतचे बदल हवामानाच्या माथी मारता येणार नाहीत. या लहान मोठ्या बदलाची कारणं, पावसाच्या या लहरीपणाची कारणं निश्चितपणे शोधण्याचे आव्हान अभ्यासकांसमोर आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker