परळी मतदारसंघ आ. धनंजय मुंडे यांचा विजय होणार सुकर
परळी विधानसभा मतदारसंघात आ. पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर धनगर समाजाचे नेते दिलीप बंडखोर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून रासप पक्षानेही अधिकृत उमेदवार दिला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा विजय सुकर झाला असल्याचे बोलले जात आहे.
‘घार उडे आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी’ या म्हणीचा प्रत्यय भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्याबाबत नेहमीच अनुभवाला येत असतो. परळी मतदारसंघात भावाच्या मदतीला मदतीला धावून येत या बहिणीने केलेल्या मध्यस्थीनंतर भाजपचे धनगर समाजाचे नेते दिलीप बीडगर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला, त्यामुळे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे, याशिवाय आ. पंकजाताईंच्या शब्दाला मान देऊन रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्यांच्या रासपचा देखील उमेदवार मतदारसंघांत दिला नाही, हे विशेष..!
विधानसभा निवडणूकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. परळी मतदारसंघांत भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना व मित्रपक्षांचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात धनगर समाजाचे नेते दिलीप बीडगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ‘घार उडे आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी’ या म्हणीप्रमाणे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे सुरवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत. भावाच्या मदतीला धावून जात या बहिणीने यशस्वी शिष्टाई करत बीडगर यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. आ. पंकजाताईंच्या नुसत्या एका शब्दावर व त्यांच्या मध्यस्थीनंतर बीडगर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. याशिवाय रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आ. पंकजाताईंच्या शब्दाला मान देत मतदारसंघांत रासपचा उमेदवार दिला नाही. भावासाठी मदतीचे नाते निभावत आ. पंकजाताईंनी घेतलेल्या या दोन्ही महत्वाच्या भूमिकांमुळे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाल्याचे पहायला मिळत आहे.
*आ. पंकजाताईंमुळे बिनशर्त माघार – दिलीप बीडगर, अशोक लोढा यांची प्रतिक्रिया*
———
आ. पंकजाताईंनी आम्हाला या अगोदरही संधी दिली होती, भविष्यातही त्या देत राहतील हा मला विश्वास आहे, त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी बिनशर्त माघार घेतली आहे अशी प्रतिक्रिया दिलीप बीडगर व बीड विधानसभेचे उमेदवार अशोक लोढा यांनी दिली. लोढा यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
••••