पंकजा मुंडे यांनी दिल्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image167115481-1678273944185-300x159.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image167115481-1678273944185-300x159.jpg)
भा.जपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त समस्त मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या आहेत. “मी आहे तुझ्यासोबत” या भावनेची शक्ती प्रत्येकींमध्ये निर्माण व्हावी अशा शब्दांत त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
पंकजाताई यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे, महिला दिन खरं तर ३६५ दिवस असायला हवा अशा मान्यतेची मी आहे. पण, तरीही हा एक दिवस आपल्याला शक्ती देवून जातो. आपण एकमेकींना शुभेच्छा देतो, शुभेच्छांचा वर्षाव करतो, हित चिंतितो, प्रत्येक महिला दुसर्या महिलेला शक्ती देते, ही शक्ती असते ” मी आहे तुझ्यासोबत ” अशा भावनेची…माझ्या मैत्रिणांना आज हेच सांगेल,माझा तुमचा परिचय असेल किंवा नसेल, मी तुम्हाला कधी भेटले असेल किंवा नसेल, पण तुम्ही मात्र मला सदैव शक्ती देता “थॅक्यू व्हेरी मच”..आपण सर्व महिला असल्याबद्दल..! आपण सर्वांनी एक गोष्ट नक्की म्हटली पाहिजे, ती म्हणजे ‘थँक्यू’! पूनश्च महिला दिनानिमित्त आपणांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.