नांदेड; टॉयलेट सफाई प्रकरणी अधिष्ठाता यांच्या तक्रारीवरुन खा. हेमंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल


हि़गोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर ऍट्रॉसिटीसह शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकडे यांना शौचालय साफ करण्यास लावल्याचे प्रकरण पडले महागात पडले. डॉ. वाकडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.


नांदेड येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे तांडव झाल्यानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. यातच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांच्या हातात झाडू देऊन त्यांना चक्क शौचालय साफ करण्यास लावले. यावेळी त्यांनी स्वतः ही पाण्याने सफाई केली, मात्र या प्रकारावर विविध वैद्यकीय आणि डॉक्टर्स संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर डीन डॉक्टर वाकोडे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ऍट्रॉसिटी कायद्यान्वये आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवानंतर संताप व्यक्त करुन खासदार हेमंत पाटील यांनी चक्क डीनच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास लावले होते.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी येथील शासकीय रुग्णालयातील 31 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर भेट दिली होती. यावेळी रुग्णालयातील प्रचंड अस्वच्छता व दुर्गंधी पाहून संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी डीनच्या हातात चक्क झाडू देऊन त्यांना शौचालय साफ करण्यास लावले होते. या प्रकरणी अधिष्ठाता डॉ. वाकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खा. हेमंत पाटील यांच्या विरोधात भादवि ३५३ आणि ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.