नवरात्री निमित्त “नवकेशर” चे मोफत दांडिया क्लास १ ऑक्टोंबर पासून सुरु
महिला व मुलींना सहभागी होण्याचे आवाहन
नवरात्र महोत्सवाचे निमित्ताने गत ९ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या नवकेशर दांडिया महोत्सवाचे याही वर्षी आयोजन करण्यात आले असून या १ ऑक्टोबर पासून सुरु होणा-या फ्री दांडिया क्लासमध्ये महिला व मुलींनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजिका सौ. आरती भिमाशंकर शिंदे यांनी केले आहे.
अंबाजोगाई शहरात नवरात्र महोत्सवानिमित्ताने दांडिया महोत्सवाची सुरुवात ९ वर्षापुर्वी नवकेशर डान्स ऍन्ड ड्रामा अकॅडमी च्या वतीने करण्यात आली. या दांडिया महोत्सवामुळे शहरातील हजारो महिला व मुलींना दांडिया खेळाचे अद्यावत फ्री प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले. शिवाय ५० हजार रुपयांच्या भरपुर बक्षिसांची लयलूट ही स्पर्धकांना करता येणार आहे.
या फ्री दांडिया क्लास मध्ये सहभागी होण्यासाठी नवकेशर च्या वतीने मोफत पास देण्यात आले आहेत. इच्छुक महिला व मुलींचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या मोफत पास मध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्या महिला व मुलींना या मोफत क्लास मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांना नवकेशर च्या सर्व नियमांचे पालन करने बंधनकारक आहे. या मोफत क्लासमध्ये सहभागी होणाऱ्या महिला व मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रुम करण्यात आली आहे, याशिवाय त्यांच्या सुरक्षेची ही काळजी घेण्यात येणार आहे. या क्लास मधील सहभागींना तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून दांडियाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या शिवाय नवरात्र महोत्सवाचे निमित्ताने नवकेशर डान्स ऍन्ड ड्रामा अकॅडमी च्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ महिलांचा “नवकेशर नवरात्र पुरस्कार” देवून सन्मानही करण्याची नवी परंपरा नवकेशर ने सुरु केली. या माध्यमातून एक मोठा परिवार नवकेशर शी जोडला गेला आहे.
या वर्षीचा नवरात्रामधीलनवकेशर दांडिया महोत्सव हा येथील खंदारे मंगल कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या महोत्सवाच्या तयारीसाठी १ ऑक्टोबर पासून फ्री दांडिया क्लासेस ला सुरुवात होणार आहे.
नवरात्र महोत्सव कालावधीत या प्रशिक्षित स्पर्धकांच्या स्पर्धा घेण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या स्पर्धकास नवकेशर डान्स ऍन्ड ड्रामा अकॅडमी च्या वर्षभराचा संपुर्ण क्लासेस ची फी असलेला रु. २०,५०० चा वार्षिक पास मोफत देण्यात येणार आहे. या मोफत क्लास आणि स्पर्धेमध्ये सहभागासाठी इच्छुक महिला व मुलींनी सौ. आरती भिमाशंकर शिंदे यांच्या मोबाईल क्रमांक ९७६५१४४८७३ किंवा ७९७२००४८३४ या वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.