दुष्काळ हटवण्यासाठी वॉटर मॅनेजमेंट ची गरज; अनिकेत लोहिया
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230205-WA0272-1024x683.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230205-WA0272-1024x683.jpg)
दुष्काळ हटविण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटची गरज असते.पाण्याच्या दुष्काळात शेतकरी व सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले.पाण्याचा दुष्काळ पडू नये म्हणून पाण्याचे नियोजन हवे. सन २०३० नंतर देशात प्यायचे पाणी खूप महाग असेल.जमीनीचे रूपांतर वाळवंटात होत आहे.शेती हा भारतीयांचा प्रमुख उद्योग आहे.उत्पादन वाढले तरच आर्थिक सुबत्ता येईल. असे प्रतिपादन अंबाजोगाई येथील मानवलोक सेवाभावी संस्थेचे कार्यवाह तथा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांनी केले ते येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या दुपारच्या सत्रात दि.४ फेब्रुवारी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करत असताना बोलत होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230205-WA0263-1024x461.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230205-WA0263-1024x461.jpg)
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव लोमटे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आधार माणुसकीचा संस्थेचे संस्थापक ॲड. संतोष पवार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाठक, उप मुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक सुभाष शिंदे, रवी मठपती, विवेकानंद कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी भागवत मसने, गणेश कदम, संमेलन प्रमुख वैशाली भुसा, शिवकन्या सोळंके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/image_editor_output_image-2011725942-1675606505608-300x138.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/image_editor_output_image-2011725942-1675606505608-300x138.jpg)
अनिकेत लोहिया आपल्या बीज भाषणात पुढे बोलताना म्हणाले की, पाण्याचा अपव्यय टाळा.नदीची स्वच्छता ठेवायला हवी.नदी म्हणजे आई होय. नद्या वाहत्या राह्यला हव्यात. नद्या वाहत्या राहण्यासाठी प्रयत्न मानवलोक संस्था करत आहे.नद्यांचे पावित्र्य भंग करू नका.पिण्याचे पाणी घाणीमुळे दुषित होत आहे.ऐंशी टक्के आजार दुषित पाण्यामुळे होतात. रसायनांचा शेतीत वापरा बंद करा.पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अबाधित ठेवा.लातूर , उस्मानाबाद व बीड तीन जिल्हयातील मांजरा नदीचा अभ्यास सुरू आहे. पालकांनी पाल्याचे आयुष्य चांगले जावे यासाठी प्रयत्नशील राहावे. ॲड .संतोष पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230205-WA0260-1024x683.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230205-WA0260-1024x683.jpg)
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी संस्थाचे कोषाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव लोमटे म्हणाले की,
अभ्यासासोबतच विविध गुणदर्शन प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा.पालक आणि शिक्षक शिक्षणाचे दोन चाके आहेत.पालकांची शिक्षकांऐवढीच विद्यार्थी घडविण्यासाठीची जिम्मेदारी असते.गुणवंत विद्यार्थ्यास विविध स्तरांवर संधी उपलब्ध होते.विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी पाल्यांनी शिक्षकांशी संवाद साधावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत मसने, तिलोत्तमा इंगोले, बी.डी. खोडेवाड, सौ थोरात यांनी केले.
उप मुख्याध्यापक विलास गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230205-WA0261-1024x683.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230205-WA0261-1024x683.jpg)
● दरम्यान सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांनी विविध गुण प्रदर्शन केले. लेझीम, देशभक्तीपर गीते, भारुड ,एक पात्री नाटकाचा समावेश होता.
माऊली माऊली , लेझीम वरील डान्स ,लावणी, कष्टाचा रुपया नाटिका.
बुरगुंडा भारुड एकपात्री अभिनय, जोगवा गीत, तेरी मिट्टी मे मिल जावा या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.