महाराष्ट्र

दिव्यांग मुलीवर घरात घुसून अत्याचार;२५ हजार दंड, ३०वर्षे सक्तमजुरी शिक्षा

घरात घुसून दिव्यांग मुलीवर अत्याचार – आरोपीस २५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अप्पर सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी ठोठावली.

घरात घुसून बळजबरीने केला अत्याचार

      अप्पर सत्र न्यायाधीश  संजश्री. जे. घरत  यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या सत्र खटला क्र. १५९ / २०२१ महाराष्ट्र शासन वि. पवन विश्वनाथ उखंडे या प्रकरणातील फिर्यादीचे शेजारी राहणाऱ्या आरोपी पवन उकंडे याने फिर्यादी दिव्यांग असल्याचा तसेच घरी कोणी नाही याचा गैरफायदा घेऊन घरात घुसून तिचे इच्छेविरुध्द बळजबरीने संभोग केला. या प्रकरणात मा. न्यायालयाने सरकार पक्षाचा साक्षीपुरावा व सरकारी वकील अॅड. रामेश्वर मन्मथअप्पा ढेले यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपींस दोषी धरून २५ वर्ष सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड ठोठावला.

शेजारी राहणाऱ्या युवकानेच केला अत्याचार

दिव्यांग फिर्यादी हिने पो.स्टे. परळी येथे फिर्याद दिली की, ती दिव्यांग आहे व ती तिचे आईवडीलासह राहते. तिचे घरा शेजारी पवन विश्वनाथ उखड़े हा राहतो. तो नेहमी तिचे घरी येत होता. ०५ फेब्रुवारी २०२१ रोजी तिचे आई वडील मजुरी करीता लोकांच्या शेतात सकाळी १०:०० वा. गेले होते. ती तिच्या राहते घरी एकटीच पलंगावर झोपलेली होती. दुपारी घरी कोणीही नव्हते तेव्हा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तिचा शेजारी पवन विश्वनाथ उखंडे हा तिच्या घरात आला व त्यांने मला तुझे कपडे काढु दे असे म्हणाला व तिचें कपडे काढून तिचे अंगावर झोपुन त्याने तिचे इच्छेविरुध्द बळजबरीने संभोग केला आहे. नंतर तिचे ओरडण्याच्या आवाजाने तिचे काका सटवा सोनाजी गव्हाणे हे आले त्यांनी काय करतो रे पवण्या असे म्हणताच तो घरातून पळुन गेला. 

साक्षीपुरावे व युक्तीवाद ग्राह्य धरुन दिला निकाल

अशा आशयाच्या फिर्यादी वरून परळी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गु.र.नं. ३० / २०२१, कलम ३७६ (२) (फ) (एल), ३५४,३५२ भा.द.वि.सह कलम ९२ अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. व आरोपी विरुद्ध मा.न्यायलयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. त्यानुसार सरकार पक्षतर्फे सदर प्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले व मा.न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस दोषी धरून २५ वर्ष सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड ठोठावला.

फिर्यादी च्या मृत्यू नंतर लागला निकाल

या प्रकरणाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. प्रकरणात विशेष बाबा म्हणजे यातील फिर्यादी हि दिव्यांग होती व ती प्रकरणात पुरावा चालू असताना तिचा पुरावा झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिला या निकालाने खरोखर मरणोत्तर न्याय मिळाला. अशी भावना जन मानसात व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरण मध्ये ऍड विलास लोखंडे यांनी अथक परिश्रम करून फिर्यादी व तिचे कुटुंब यांचे सर्वार्थाने मदत व पुनर्वसन केले.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऍड. रामेश्वर मन्मथअप्पा ढेले यांनी काम पाहीले व त्यांना ऍड. अशोक व्ही. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन केले व त्यांना अँड विलास लोखंडे व ऍड. नितीन पूजदेकर यांनी सहकार्य केले. सदर प्रकरणात पोलीस पैरवी अधिकारी पी.एस.आय. जमादार व पोलीस पैरवी पो. कॉ. गोविंद कदम, पो. कॉ. बाबुराव सोडगीर व पो.हे.कॉ. अविनाश गित्ते यांनी काम पाहीले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker