महाराष्ट्र

दमदार आमदारांना वाढदिवसाच्या दमदार शुभेच्छा…!

केज विधानसभेच्या आ. सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व करतांना आणि केज विधानसभा मतदार संघातील प्रश्र्नांची सोडवणुक करतांना राज्यातील नव्या आमदारांमध्ये आपली प्रतिमा दमदार आमदार अशी बनवली हे सर्वश्रुत झाले आहे. ही बाब केज विधानसभा मतदारसंघासाठीच नव्हे तर राज्यातील सर्वच नवख्या आमदारांना दिशादर्शक आहे.

       लग्न होण्यापूर्वी राजकारणाचा कसलाही वारसा, बाळकडु नसतांना, लग्न होवून नंदकिशोर मुंदडा यांची सुन बने पर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याची कसलीही सवय नसतांना, ग्रामीण भागाची,  त्या भागातील प्रश्र्नांची जाण नसतांना अल्प काळातच सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करणे हे सोप्प काम नाही. पण आ. सौ. नमिता मुंदडा यांनी हे सहज शक्य करुन दाखवले.

विधानसभा निवडणुकी पुर्वीपासुनच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची आस घेऊन ज्या पद्धतीने आ. सौ. नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या प्रत्यक्ष  दारात जाऊन संपर्क साधलात्याच वेळी त्यांचा विजय निश्चित झाला होता.

आ. सौ. नमिता मुंदडा यांची विधानसभेतील ही पहिली टर्म असली तरी विधानसभेतील त्यांचा पहिल्या दिवसापासूनचा वावर हा नवख्या आमदारांना सारखा मुळीच नव्हता. त्यांनी विधानसभेत पाहीले पावूल ठेवले तेच मुळी अत्यंत आत्मविश्वासाने

विधानसभेत जाण्यापूर्वी केज विधानसभा मतदारसंघातील सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण करून घेणे आणि त्या प्रश्नांचा अभ्यासकरुनच विधानसभेत पाऊल ठेवते हा नियमच त्यांनी अंगी बाळगुन घेतला असल्याचे सातत्याने जाणवते. 

    आ. सौ. नमिता मुंदडा यांना विधानसभेतील सुरुवातीची काही वर्षे विरोधकांसाठी आरक्षीत असलेल्या बाकावर बसण्याची संधी मिळाल्यामुळे तर त्या अधिकच तावूनसुलाखून निघाल्या. विरोधी पक्षातील आमदारांची सत्ताधारी पक्ष अशी जागोजागी अडवणुक करतो याची जाण या निमित्ताने त्यांना झाली.       

     आज सुदैवाने आ. नमिता मुंदडा यांना सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसण्याची संधी मिळाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्यामुळे आ. नमिता मुंदडा यांना केज विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रलंबित कामे मंजूर करवून घेवून त्या कामासाठी निधी मंजूर करुन घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे. आणि या संधीचे सोनं करुन घेतांना आ. नमिता मुंदडा आज दिसत आहेत. सत्तांतरातील बदलानंतर अवघ्या काही महिन्यातच आ. सौ. नमिता मुंदडा यांनी जवळपास तीनशे कोटींची कामे मंजूर करवून घेवून त्यासाठी निधी मंजूर करुन घेतला आहे. ही काढिले तारीफ बाब आहे.

  आ. सौ. नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदार संघातील प्रलंबीत प्रश्र्नांच्या सोडवणुकीसाठीचे, मतदार संघाच्या विकासासाठीचे सुरु केलेले प्रयत्न प्रशंसनीयच आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावाचे प्रश्र्न समजावून घेणे आणि ते प्रश्र्न सोडवण्यासाठी मंत्रालयात जावून संबंधित मंत्र्यांकडे जावून अभ्यासपूर्ण पध्दतीने त्या प्रश्र्नांची मांडणी करुन ते प्रश्र्न सोडवून घेणे हे साधे काम नाही. पण ही किमया आ. सौ. नमिता मुंदडा यांना लिलिया जमली आहे.

   आ‌. सौ. नमिता मुंदडा यांना हे सहज शक्य होतं आहे ते केवळ तेवढ्याच ताकदीचा  दमदार जोडीदार त्यांना मिळाल्यामुळे. अक्षय मुंदडा यांच्या सारखा मंत्रालयाच्या प्रत्येक कामाची माहीती असलेला जोडीदार आ. सौ. नमिता मुंदडा यांना मिळाला. आणि त्या ही पेक्षा अधिक ताकतीचे, मतदार संघातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच लहान-मोठ्या माणसांची मापे माहीत असलेल्या नंदकिशोर मुंदडा यांच्या सारख्या पितृतुल्य सास-यांचे सातत्याने मौलीक मार्गदर्शन ही त्यांना मिळते आहे ही त्यांच्या जमेची बाजू आहे. यामुळेच त्यांची प्रतिमा “दमदार आमदार” अशी बनली आहे.

      आ. सौ. नमिता मुंदडा या अधिवेशनातील कामकाजात पुर्णवेळ सहभाग घेत असल्यामुळे त्या संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेत आल्या आहेत. मागील काळातील  अधिवेशनात त्यांनी कोवीड काळात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणे, वीज मंडळाचा अनागोंदी कारभाराची लक्तरे विधानसभा अधिवेशनापुर्वी मांडुन त्या चर्चेत आल्या होत्या. आता मतदारसंघातील प्रत्येक प्रश्नांचा बारीकेने अभ्यास करून ते प्रश्न शासनासमोर आणून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्या सातत्याने पुढाकार घेत असल्याचे दिसत आहेत. 

एकेकाळी केज विधानसभा मतदारसंघावरच नव्हे तर बीड जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणा-या, राजकारणावरील आपली मजबुत पकड सतत २५ वर्षे कायम ठेवणा-या महाराष्ट्राच्या माजी मंत्री लोकनेत्या डॉ. सौ. विमल मुंदडा यांचा खरा राजकीय वारसा आपल्या कर्तृत्वाने सिध्द करण्याचा प्रयत्न त्यांच्या स्नुषा आ. सौ. नमिता मुंदडा या करीत आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे.

      आ.सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी सुरु केलेल्या या दमदार कामास  आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना ही खुप खुप शुभेच्छा..!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker