दमदार आमदार नमिता मुंदडा यांना वाढदिवसाच्या दमदार शुभेच्छा…!
@ ४ मार्च


वाढदिवसाच्या दमदार शुभेच्छा..!!
केज विधानसभेच्या आ. सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व करतांना आणि केज विधानसभा मतदार संघातील प्रश्नांची सोडवणुक करतांना राज्यातील नव्या आमदारांमध्ये आपली प्रतिमा दमदार आमदार अशी बनवली हे सर्वश्रुत झाले आहे. ही बाब केज विधानसभा मतदारसंघासाठीच नव्हे तर राज्यातील सर्वच नवख्या आमदारांना दिशादर्शक आहे.
लग्न होण्यापूर्वी राजकारणाचा कसलाही वारसा, बाळकडु नसतांना, लग्न होवून नंदकिशोर मुंदडा यांची सुन बने पर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याची कसलीही सवय नसतांना, ग्रामीण भागाची, त्या भागातील प्रश्र्नांची जाण नसतांना अल्प काळातच सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करणे हे सोप्प काम नाही. पण आ. सौ. नमिता मुंदडा यांनी हे सहज शक्य करुन दाखवले.


२०१९ च्या विधानसभा निवडणुकी पुर्वीपासुनच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची आस घेऊन ज्या पद्धतीने आ. सौ. नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या प्रत्यक्ष दारात जाऊन संपर्क साधलात्याच वेळी त्यांचा विजय निश्चित झाला होता. या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये
आ. सौ. नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघात केलेली विकासकामे ही खरेच कौतुकास्पद आहेत.
विधानसभेतील ही पहिली टर्म असली तरी विधानसभेतील त्यांचा पहिल्या दिवसापासूनचा वावर हा नवख्या आमदारांना सारखा मुळीच नव्हता. त्यांनी विधानसभेत पाहीले पावूल ठेवले तेच मुळी अत्यंत आत्मविश्वासाने विधानसभेत जाण्यापूर्वी केज विधानसभा मतदारसंघातील सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण करून घेणे आणि त्या प्रश्नांचा अभ्यासकरुनच विधानसभेत पाऊल ठेवने हा नियमच त्यांनी अंगी बाळगुन घेतला असल्याचे सातत्याने जाणवते राहते.
आ. सौ. नमिता मुंदडा यांना विधानसभेतील सुरुवातीची काही वर्षे विरोधकांसाठी आरक्षीत असलेल्या बाकावर बसण्याची संधी मिळाल्यामुळे तर त्या अधिकच तावूनसुलाखून निघाल्या. विरोधी पक्षातील आमदारांची सत्ताधारी पक्ष अशी जागोजागी अडवणुक करतो याची जाण या निमित्ताने त्यांना झाली.
आज सुदैवाने आ. नमिता मुंदडा यांना सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसण्याची संधी मिळाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्यामुळे आ. नमिता मुंदडा यांना केज विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रलंबित कामे मंजूर करवून घेवून त्या कामासाठी निधी मंजूर करुन घेण्याच्या मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करुन घेतले आहे.


राज्यात झालेल्या सत्तांतरातील बदलानंतर आत्तापर्यंत आ. सौ. नमिता मुंदडा हजारो कोटींची कामे मंजूर करवून घेवून त्यासाठी निधी मंजूर करुन घेतला आहे. अंबाजोगाई शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी आणलेला करोडो रुपयांचा निधी, या रस्त्यांची सुरु असलेली दर्जेदार कामे, शहरातुन जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सहा पदरी रस्त्यात होणारे रुपांतर, शहरालगत असलेल्या पुरातन मंदिरांच्या जतन आणि दुरुस्ती साठी आणलेला करोडो रुपयांचा निधी, सामान्य माणसांच्या आरोग्य सक्षम करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या यंत्रसामुग्री, वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना राहण्यासाठी अद्दयावत वसतिगृह आणि रुग्णसेवेत वाढ करण्यासाठी बांधण्यात आलेल्या अद्दयावत इमारती, सर्व सोयींनी युक्त असे प्रशस्त नुतनीकरण करण्यात आलेले बसस्थानक, नवीन शासकीय इमारतींसाठी आणलेला निधी अशा किती तरी कामांचा उल्लेख याठिकाणी सहजपणे करता येईल.
आ. नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरासोबतच केज शहर आणि मतदार संघातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहंचवली आहे, हे मतदार संघातील ग्रामीण भागात फिरताना ही सहज जाणवते.


आ. सौ. नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदार संघातील प्रलंबीत प्रश्र्नांच्या सोडवणुकीसाठीचे, मतदार संघाच्या विकासासाठीचे सुरु केलेले प्रयत्न प्रशंसनीयच आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावाचे प्रश्र्न समजावून घेणे आणि ते प्रश्र्न सोडवण्यासाठी मंत्रालयात जावून संबंधित मंत्र्यांकडे जावून अभ्यासपूर्ण पध्दतीने त्या प्रश्र्नांची मांडणी करुन ते प्रश्र्न सोडवून घेणे हे साधे काम नाही. पण ही किमया आ. सौ. नमिता मुंदडा यांना लिलिया जमली आहे.
आ. सौ. नमिता मुंदडा यांना हे सहज शक्य होतं आहे ते केवळ तेवढ्याच ताकदीचा दमदार जोडीदार त्यांना मिळाल्यामुळे. अक्षय मुंदडा यांच्या सारखा मंत्रालयाच्या प्रत्येक कामाची माहीती असलेला जोडीदार आ. सौ. नमिता मुंदडा यांना मिळाला. आणि त्या ही पेक्षा अधिक ताकतीचे, मतदार संघातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच लहान-मोठ्या माणसांची मापे माहीत असलेल्या नंदकिशोर मुंदडा यांच्या सारख्या पितृतुल्य सास-यांचे सातत्याने मौलीक मार्गदर्शन ही त्यांना मिळते आहे ही त्यांच्या जमेची बाजू आहे. यामुळेच त्यांची प्रतिमा “दमदार आमदार” अशी बनली आहे.


आ. सौ. नमिता मुंदडा यांनी आजपर्यंत झालेल्या सर्वच अधिवेशनातील कामकाजात पुर्णवेळ सहभाग घेतला असल्यामुळे त्या संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेत आल्या आहेत. या सर्व अधिवेशनात त्यांनी कोवीड काळात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणे, वीज मंडळाचा अनागोंदी कारभाराची लक्तरे विधानसभा अधिवेशनापुर्वी मांडुन त्या चर्चेत आल्या होत्या. आता मतदारसंघातील प्रत्येक प्रश्नांचा बारीकेने अभ्यास करून ते प्रश्न शासनासमोर आणून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्या सातत्याने पुढाकार घेत असल्याचे दिसत आहेत.
एकेकाळी केज विधानसभा मतदारसंघावरच नव्हे तर बीड जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणा-या, राजकारणावरील आपली मजबुत पकड सतत २५ वर्षे कायम ठेवणा-या महाराष्ट्राच्या माजी मंत्री लोकनेत्या डॉ. सौ. विमल मुंदडा यांचा खरा राजकीय वारसा आपल्या कर्तृत्वाने सिध्द करण्याचा प्रयत्न त्यांच्या स्नुषा आ. सौ. नमिता मुंदडा या करीत आहेत, ही आनंद देणारी बाब आहे.
आ.सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघासाठी सुरु केलेल्या दमदार कामासह त्यांच्या उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा..!