ड्रिंक्स सोबत जास्त खारट पदार्थ खाणे ठरु शकते घातक; येवू शकतो हार्टऍटॅक
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/31-december-dinvishesh-300x158.webp)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/31-december-dinvishesh-300x158.webp)
नमस्कार मित्रांनो…
३१ डिसेंबर म्हटलं की सेलिब्रेशन आलंच! चार मित्र गोळा करणे, ड्रिंक्स घेणे, मनसोक्त गप्पा मारत आनंद घेणे, सोबत स्नॅक्स म्हणून आरबट चरबट खाणे हे सगळं आलंच!
पण लक्षात ठेवा मित्रांनो…
ड्रिंक्स सोबत जास्त खारट पदार्थांचे स्नॅक्स म्हणून खाणं तुमच्या अंगलट येवू शकते, यामुळे कदाचित तुम्हाला हार्ट ऍटॅक ही येवू शकतो, असं तज्ञांच मत आहे. दिव्य मराठी च्या टीम ने यासंदर्भात एक स्पेशल स्टोरी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये अनेक तज्ञ डॉक्टरांनी आपली मतं मांडली आहेत!
आपण ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी ड्रिंक्स घेणार असाल तर खुशाल घ्या. पण या टिप्सची ही काळजी घ्या!
आणि नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करा!!
🙏
ख्रिसमसपासून नवीन वर्षापर्यंत पार्टीचा हंगाम सुरू असतो. त्या वर, जर तुम्ही मित्रांसह सुट्टीवर असाल तर ड्रिंक आणि खारट स्नॅक्सला मर्यादा नसते.
तुम्ही कधी विचार केला आहे का की, आनंदासाठी ड्रिंक्ससोबत जास्त मीठ असलेले स्नॅक्स खाणे तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकते.
या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. सुट्टीमुळे होणाऱ्या हृदयाशी संबंधित या समस्येला हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणतात.
आपण इथे “हॉलिडे हार्ट सिंड्रोम”च्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत आणि ते कसे टाळता येईल ते समजून घेणार आहोत….
आजचे तज्ञ आहेत….
डॉ. निकोलस रुथमॅन, हृदयरोगतज्ज्ञ, क्लीव्हलँड क्लिनिक, न्यूयॉर्क.
डॉ. क्रिस्टन ब्राउन, कार्डिओव्हॅस्कुलर फेलो, नेबरास्का मेडिकल सेंटर, यू.एस.
डॉ. ग्रेगरी मार्कस, मेडिसिन प्राध्यापक, कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्को
डॉ. हिमांशू राय, पोषणतज्ञ, दिल्ली.
डॉ. अजित मेनन, सल्लागार कार्डियाक सायन्स, सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई, महाराष्ट्र.
😁
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221230_155319-1024x458.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221230_155319-1024x458.jpg)
प्रश्न: हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?
उत्तर: पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि फ्रेंच फ्राईज यांसारखे आणि मीठयुक्त पदार्थ अल्कोहोल सोबत जास्त खाल्ल्याने हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. सणासुदीच्या काळात असे अनेकदा घडते. याला हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणतात. या अवस्थेत, हृदयविकार नसतानाही, हृदयाची गती जलद होते आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.
प्रश्न: याला सॉल्टी हार्ट सिंड्रोम असेही म्हणतात का?
उत्तर: होय, हॉलिडे हार्ट सिंड्रोमला सॉल्टी हार्ट सिंड्रोम देखील म्हटले जाऊ शकते. याशिवाय, याला अल्कोहोल-इंड्यूस्ड अॅट्रियल ॲरिथमियाज देखील म्हणतात. या अवस्थेत मद्य आणि मीठाच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि रक्ताभिसरणात समस्या निर्माण होतात.
प्रश्न: मीठ आणि अल्कोहोलचा हृदयाशी काय संबंध आहे?
उत्तर: जास्त मीठ खाल्ल्याने…
शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
उच्च रक्तदाबामुळे अशा लोकांनाही हृदयविकाराचा धोका असतो, ज्यांना यापूर्वी ही समस्या नव्हती.
हृदयविकाराने ग्रस्त लोकांसाठी, उच्च रक्तदाब हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो.▪️जास्त दारू पिल्याने…
• उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघा धोका वाढतो.
• यामुळे, कार्डिओमायोपॅथीची स्थिती देखील विकसित होते. यामध्ये, हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होतो ज्यामुळे हृदय शरीराच्या इतर भागांमध्ये योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही.
• कार्डिओमायोपॅथीमुळे हृदय बंद देखील होऊ शकते.
▪️जास्त दारू पिल्याने…
• उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघा धोका वाढतो.
• यामुळे, कार्डिओमायोपॅथीची स्थिती देखील विकसित होते. यामध्ये, हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होतो ज्यामुळे हृदय शरीराच्या इतर भागांमध्ये योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही.
• कार्डिओमायोपॅथीमुळे हृदय बंद देखील होऊ शकते.
प्रश्न: हॉलिडे हार्ट सिंड्रोमचे निदान कसे केले जाऊ शकते?
उत्तर: हॉलिडे हार्ट सिंड्रोमची लक्षणे दिसू लागल्यावर डॉक्टर रुग्णाचा अल्कोहोल आणि फूड हिस्ट्री तपासतात. यानंतर हृदयाशी संबंधित आजारांसाठी चाचण्या केल्या जातात. हृदयाशी संबंधित सर्व चाचण्या क्लिअर असूनही लक्षणे आढळल्यास तो हॉलिडे हार्ट सिंड्रोम असतो.
प्रश्न: या सिंड्रोमचा प्रभाव किती काळ टिकतो?
उत्तर: हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा प्रभाव बहुतेक फक्त 24 तास टिकतो. पण त्याला हलक्यात घेऊ नका. तो आपोआप बरा होईल असे मानणे योग्य नाही. हृदयाशी संबंधित काही समस्या असल्यास डॉक्टरांना नक्की भेटा. धोका पत्करू नका.
प्रश्न: हा सिंड्रोम स्वतःच बरा होऊ शकतो का?
उत्तर: अल्कोहोलचे परिणाम कमी झाल्यामुळे हॉलिडे हार्टची बहुतेक प्रकरणात रुग्ण बरे होतात. बहुतेक लोकांमध्ये उपचारांशिवाय 24 तासांच्या आत सुधारणा होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221230_155302-684x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221230_155302-684x1024.jpg)
प्रश्न: हॉलिडे हार्ट सिंड्रोममुळे हृदयविकाराचा झटका येऊ
शकतो का?
उत्तर: होय, नक्कीच. हॉलिडे हार्ट सिंड्रोम काही लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. कार्डिओमायोपॅथी नावाची स्थिती देखील असू शकते, ज्यामुळे हृदय बंद पडते.
प्रश्न : सुट्ट्या आणि पायमध्ये जेवणाची काळजी कशी घ्यावी?
उत्तर : सुट्ट्या आणि सणांच्या काळात अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे.
यासाठी…
• जर तुम्ही पार्टीला जात असाल तर घरी जेवण करुन जा. यामुळे तुम्ही पार्टी फूड कमी खाताल.
• दारू पिणे टाळा.
अन्न घेतांनाच नियंत्रण ठेवा. सर्व काही कमी घ्या.
पार्टीला जाण्यापूर्वी काय खावे आणि काय नाही याचे नियोजन करा.
हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा.
• हृदय, कोलेस्टेरॉल इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी औषध घ्यायला विसरू नये.
प्रश्न: अति मीठामुळे हृदयाच्या समस्यांशिवाय आणखी कोणते नुकसान होऊ शकते?
उत्तर: जास्त मीठ खाल्ल्याने केवळ हृदयाचेच नाही तर इतर अवयवांचेही नुकसान होते. पोट फुगणे : जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात जास्तीचे पाणी जमा होते. यामुळे पोट फुगणे आणि पोटात घट्टपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
शरीरावर सूज येणे :
जास्त मीठ खाल्ल्याने पाणी टिकून राहण्याची समस्या उद्भवते. यामुळे हात, पाय आणि चेहऱ्याला सूज येऊ शकते.
निद्रानाश:
जे लोक रात्रीच्या जेवणात जास्त मीठ खातात त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. हे लोक रात्री अनेक वेळा जागे होतात त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो.
वजन वाढणे :
मीठ जास्त खाल्ल्याने शरीरात पाणी साचते. यामुळे वजन वाढते.
अर्धांगवायू:
जास्त मीठ आपल्या मज्जासंस्थेचे नुकसान करते. यामुळे अर्धांगवायू होऊ शकते.
कमकुवत हाडे :
जास्त मीठ खाल्ल्याने लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे हाडे कमकुवत होतात.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221230_155437-604x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221230_155437-604x1024.jpg)
किडनीची समस्या:
मीठ जास्त खाल्ल्याने शरीरातील पाणी लघवी आणि घामाद्वारे वेगाने बाहेर पडू लागते. त्यामुळे किडनी वेगाने काम करू लागते आणि त्यामुळे किडनीचा त्रास होऊ शकतो.
त्वचेला संसर्ग: जास्त मीठ खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. खाज येण्याच्या अनेक कारणांपैकी मीठ हे देखील एक कारण आहे.
प्रश्न: हृदयाशिवाय अल्कोहोलमुळे इतर कोणत्या अवयवाला इजा होते?
उत्तरः अल्कोहोलमुळे तुमच्या हृदयाचेच नव्हे तर इतर अवयवांचेही नुकसान होते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर ते हानिकारक असू शकते.
यकृताचे नुकसान:
यकृत आपल्या शरीरातून हानिकारक गोष्टी काढून टाकण्याचे काम करते. जे लोक नियमितपणे दारू पितात त्यांचे यकृत योग्यरित्या कार्य करू शकत नाही. अल्कोहोलमुळे यकृताला जळजळ होऊ शकते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
वंध्यत्व:
गर्भवती महिलांसाठी दारू पिणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जन्मलेल्या बाळांसाठी धोकादायक असू शकते. यामुळे अकाली प्रसूती, गर्भपात, फेटल अल्कोहोल सिंड्रोम डिसऑर्डर (FASD) आणि मृत बाळाचा जन्म होऊ शकतो. संशोधनात असे आढळून आले की दारू न पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत मद्य सेवन करणाऱ्या महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता 18% कमी होते.
डिसार्थरिया :
ज्या अवस्थेत शब्द बोलण्यात अडचण येते त्याला डिसार्थरिया म्हणतात. जास्त मद्यपान केल्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे ही स्थिती विकसित होते.
ऑस्टिओपोरोसिस:
अल्कोहोल आणि ड्रग्सच्या अतिसेवनामुळे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखे आवश्यक पोषक शरीरात शोषले जात नाहीत. त्यामुळे हाडे कमजोर होतात. या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात.
प्रश्न : मीठ कमी खाण्याने काही नुकसान होऊ शकते का?
उत्तर : होय, मीठ कमी खाल्ल्यानेही शरीराला हानी पोहोचते.
कमी रक्तदाब ही समस्या असू शकते.
टाइप 2 मधुमेहाचा बळी ठरु शकता.
आळस आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
मेंदू आणि हृदयात सूज येऊ शकते.
बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
प्रश्न: सामान्य माणसासाठी किती मीठ आणि अल्कोहोल पुरेसे आहे?
उत्तरः ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका सामान्य
माणसाने दिवसात फक्त 2 ग्रॅम मीठ खावे. त्याच वेळी, भारतात दारूबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, निरोगी महिलेने एक किंवा त्यापेक्षा कमी पेये आणि निरोगी पुरुषाने दोन किंवा त्याहून कमी पेग पिणे आवश्यक आहे.