ठळक बातम्या

डॉ. सोनल आरसुडे यांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती

डॉ ‌ सोनल आरसुडे यांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती
अंबाजोगाईचे भुमीपुत्र डॉ. सोनल सुरेश अरसुडे यांची पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज येथे छाती व उर रोग विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने सदरील नियुक्ती केली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशी नुसार पत्र क्रं.एमडीआर-०८२२/प्रा.क्र.१८/२०२२अठ्ठावीस,दि. ३०/११/२२ नुसार सदरील नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. सोनल सुरेश अरसुडे हे अंबाजोगाई येथील रहिवासी असून ते पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज येथील छाती व उर रोग विभागात लेक्चरर म्हणून कार्यरत होते. मध्यंतरी कोवीड काळात त्यांनी तेथे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले होते. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापकांच्या रीक्त असलेल्या जागी घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर डॉ. सोनल आरसुडे यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. सोनल आरसुडे हे येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातुन निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. सुरेश आरसुडे यांचे चिरंजीव आहेत. डॉ. सोनल आरसुडे यांच्या पदोन्नती बद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, आ. नमिता मुंदडा, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार, माजी आमदार संजय दौंड, पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व इतरांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker