डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image1104244194-1684900839345-273x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image1104244194-1684900839345-273x300.jpg)
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची महाराष्ट्र शासनाच्या नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाने वैद्यकशास्त्र या विषयातील अभ्यास मंडळावर निवड केली आहे.
डॉ. सिध्देश्वर बिराजदार हे येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेली अनेक वर्षे मेडिसीन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मेडिसीन विषयातील अध्यापनासोबतच -हदय विकार व मेडिसीन विभागाशी संबंधित असलेल्या आजारांवर प्रभावी उपचार करणारे एक निष्णात डॉक्टर म्हणून डॉ सिध्देश्वर बिराजदार यांची ओळख आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230524_094526-1024x917.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230524_094526-1024x917.jpg)
मेडिसीन विभागातील त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाने त्यांची अभ्यास मंडळावर निवड केली आहे. डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांना यापुर्वी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230524_094539-1024x759.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230524_094539-1024x759.jpg)
सदरील नियुक्तीबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, आ. नमिता मुंदडा, विधानसभेचे माजी सदस्य संजय दौंड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी मंत्री ऍड. पंडीतराव दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बाजार समितीचे सभापती ऍड. राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर वडमारे, प्रा. पंडीत कराड, प्रा. शांतिनाथ बनसोडे, डॉ. सुरेश आरसुडे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राकेश जाधव व इतरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.