महाराष्ट्र

डॉ. दिनकर राऊत यांनी दिले ६५० ग्रॅम वजनाच्या बाळाला जीवनदान!

केज या अतिशय छोट्या तालुक्यात बालरोग चिकित्सा विभागात अतिशय अफलातून उपचार करणारे एक अद्दायावत रुग्णालय आहे. वकीलवाडी परिसरात असणाऱ्या या “योगिता बाल रुग्णालय” या अद्दायावत रुग्णालयाला भेट देण्याचा योग मला काही दिवसांपुर्वी आला होता. या रुग्णालयात बाल उपचारासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि त्या सुविधा पुरवणा-या डॉ. दिनकर राऊत यांचे काम पासुन मी अचंबित झालो होतो. एवढे मोठे धाडस करणा-या डॉ. दिनकर राऊत यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा माझा सतत प्रयत्न चालू होता. त्या अनुषंगाने चर्चा करीत असतांना बाल चिकित्सा मधील त्यांचे ज्ञान मला मोहित करुन टाकत होते. केज सारख्या छोट्या गावात राहुन बाल चिकित्सा मध्ये देश आणि जागतिक पातळीवर होणारे नवनवीन संशोधनात बाबत डॉ. दिनकर राऊत अपडेट दिसत होते. देश भरात बाल चिकित्सा विषयावरील त्यांचा सहभाग, त्यांनी सादर केलेले संशोधनात्मक प्रबंध हे सगळं मुंबई, पुणे सारख्या मेट्रोपॉलिटन शहरातील राहणा-या डॉक्टरांपेक्षाही अधिक अपडेट असल्याचे मला जाणवत होते.

अतिशय मागास आणि छोट्या समजल्या जाणाऱ्या केज येथील डॉ. दिनकर राऊत यांच्या या रुग्णालयात ६५० ग्रॅम वजन असलेल्या बाळास जीवनदान देणारे डॉ. दिनकर राऊत हे आता पुन्हा एकदा बालचिकित्सा क्षेत्रात चर्चेत आले आहेत. केज तालुक्यातील कानाडीमाळीचे रहिवाशी असलेल्या डॉ. दिनकर राऊत यांनी वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन बाल रोग चिकित्सा या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. कांहीं काळ बालरोग तज्ञ या पदावर शासकीय रुग्णालयात चिचोली माळी या ठिकाणी शासकीय सेवा केली. नंतर २००५ ला केज शहरात योगीता बाल रुग्णालय चालू केले. केज सारख्या छोट्याशा गावात अद्दायावत बाल रुग्णालय उभा करण्याचा त्यांचा धाडसी निर्णय तेंव्हा अनेकांना अचंबित करणारा वाटत होता. केज शहरापासून जवळ असलेल्या अंबाजोगाई येथे वैद्यकीय महाविद्यालय आहे. याठिकाणी बाल रोग चिकित्सा विभाग मोठा आहे. मात्र या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जेवढ्या आवश्यक ती यंत्रसामग्री आणि वैद्यकीय सुविधा नाहीत, त्या डॉ. दिनकर राऊत यांनी आपल्या योगिता बाली रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या आहेत.

तंस पहिल तर हे रुग्णालय बीड जिल्ह्यातील पहिले एन ए बी एच चे नामांकित बाल रुग्णालय आहे पुणे मुंबई प्रमाणे या रुग्णालयात अनेक प्रकारांच्या सुविधा उपलब्ध आहेत मराठवाड्यात फार मोठ्या प्रमाणात बाल रुग्णालय आहेत त्या पैकी केज सारख्या ग्रामीण भागात केज येथील योगिता बाल रुग्णालय हे लहान बालकांसाठी एक वरदानच ठरले आहे सद्य परिस्थितीत औरगांबाद, लातूर, नांदेड या ठिकाणी सर्व सोयी युक्त बाल रुग्णालय आहेत पण या ठिकाणी सुद्धा ६५० ग्राम च्या बाळाला जीवदान देणे शक्य झाले नाही ते योगीता बाल रुग्णालयाचे प्रमुख डॉ दिनकर राऊत यांनी शर्तीचे प्रयत्न करून जहांगीर मोहा ता धारूर येथील २६ आठवड्याच्या बाळाला जीवदान दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रिंकल मुंजाराम निर्दे रा. जहांगीर मोहा ता धारूर ची एमसीएच २६ आठवडे अत्यंत अकाली जन्मलेली अत्यंत कमी ६५० ग्राम वजनाचे बाळ योगीता बाल रुग्णालयात ३ मे रोजी दाखल झाले व बाळाला एन आय सी यु मध्ये दोन महिने आकरा दिवस ठेवले गेले फार शर्तीचे प्रयत्न केले जीवदान देणे फार जोखमीचे काम होते पण डॉक्टर व सर्व टीमने प्रंचड मेहनत घेतली फार वादळी कोर्स होता सर्फेक्टंट, व्हेंटिलेशन, व्हॅसोएक्टिव्ह औषधे आवश्यक होती, पी सी व्ही, एफ एफ पी, पण देवाच्या आशीर्वाद व डॉ दिनकर राऊत यांचे प्रयत्न कामी आले व नुकतीच १५ जुलै २०२३ रोजी बालिकेला सुट्टी देण्यात आली आज रिकल एकदम ठणठणीत आहे

बालीकेची आई मुदतपूर्व प्रसूतीसाठी बीडला गेली होती, स्त्रीरोग तज्ज्ञाने तिला चांगल्या परिणामासाठी अकाली बाळाची काळजी घेताना औरंगाबाद येथील उच्च केंद्रात जाण्यास सांगितले, परंतु पालकांनी तालुक्याच्या ठिकाणी येण्यास प्राधान्य दिले, कारण त्यांचा डॉ दिनकर राऊत आणि रुग्णालयाच्या टीमवर प्रचंड विश्वास होता. गर्भाशयात हस्तांतरण हे प्रिमेससाठी चांगले हस्तांतरण असते कमकुवत रडणाऱ्याור बाळाला पिशवी आणि मास्कसह पुनरुत्थान आवश्यक आहे, नंतर सर्फेक्टंट, व्हेंटिलेटर सपोर्ट, इनोट्रोप प्राप्त झाले. पॉइंट ऑफ केअर फंक्शनल इकोकार्डियोग्राफीमुळे शॉक पॅथोफिजियोलॉजी आणि व्हॅसोएक्टिव्ह औषधांचा विवेकपूर्ण वापर झाला

डॉ दिनकर राऊत यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, डॉ. प्रदीप सुर्यवंशी सर यांचे खूप खूप आभार ज्यांनी मला पी ओ सी यु एस शिकवले ज्यामुळे मला अस्थिर परिसरामध्ये हेमोडायनामिक्स समजून घेण्यात अधिक आत्मविश्वास मिळाला सुदैवाने बाळाला फक्त ग्रेड १ आय व्ही एच होते, जे चांगल्या न्यूरोलॉजिकल परिणामासाठी चांगली साथ मी आणि माझ्या एन आय यु सी टीमने शक्य ते सर्व अचूक निरीक्षण केले आणि बाळाने चांगला प्रतिसाद दिला. आनंदी समाधानी पालकांनी डिस्चार्ज झाल्यावर केवळ माझाच सत्कार केला नाही तर हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचा सत्कार केला आणि प्रत्येकाला मिठाई देऊन हॉस्पिटलमधील त्यांचे अविस्मरणीय क्षण साजरे केले. बेबीज एनआयसीयू हॉस्पिटलमध्ये ७२ दिवसांचा मुक्काम ग्रेड ठरला आणि बाळाला जीवदान मिळाले आरओपी स्क्रीनिंग करण्यात आले महात्माफुले जीवनदायी योजनेत व्यवस्थापित केले . त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान उल्लेखनीय होते ज्यामुळे आम्हाला या नोबेल वैद्यकीय व्यवसायात काम करण्याची ऊर्जा मिळते.

डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद खरोखरच आपले हॉस्पिटल म्हणजे आम्हा दोघाला स्वतःच्या घरासारखे वाटले. हॉस्पिटलमध्ये स्टाफची सेवा व तुमचा सहवास हा अगदी जवळच्या नात्यासारखा वाटला. तब्बल अडीच महिने आम्ही हॉस्पिटलमध्ये राहिलो परंतु कसलाही त्रास वाटला नाही. आपण माझ्या मुलाला दिलेले जीवदानाचा प्रसंग नक्कीच आयुष्यामध्ये अविस्मरणीय असेल. मुलाने भविष्यात जर विचारले की देव कोण आहे तर नक्कीच तुमचा फोटो दाखवून त्याला सांगेल बाळा हेच तुझ्या आयुष्यातील डॉ दिनकर राऊत हे देव आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker