डॉ. इंगोले यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून निवड


डॉ.राजेश इंगोले यांची इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागप्रमुखपदी निवड
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा इंडीयन मेडीकल असोसिएशन अंबाजोगाईचे सलग आठ वर्षे अध्यक्षपद भूषविलेले विक्रमादित्य डॉ.राजेश इंगोले यांच्या आय.एम.ए. संघटनेतील भरीव व दमदार कार्याची दखल घेत त्यांची थेट राज्यकार्यकरणीच्या सांस्कृतिक समितीचे विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आय.एम.एचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.रवींद्र कुटे, डॉ.जयेश लेले, सचिव डॉ.संतोष कदम, माजी अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे, डॉ.दिनेश ठाकरे, डॉ.राजीव अग्रवाल यांच्यासह राज्यकार्यकरणीच्या सर्व सदस्यांनी एकमताने डॉ.राजेश इंगोले यांची सांस्कृतिक समितीच्या चेअरमनपदी निवड केली आहे. मागील आठ वर्षांपासून डॉ.राजेश इंगोले यांनी ज्या धडाडीने आणि तडफेने संघटनेचे काम केले त्याची दखल घेऊन राज्यकार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी डॉ.राजेश इंगोले यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड केली आहे.
डॉ.राजेश इंगोले यांनी अंबाजोगाईच्या शाखेचे अध्यक्ष म्हणून काम करीत असताना संघटनेला तीन वेळा सर्वोत्कृष्ट शाखा, तीन वेळेस सर्वोत्कृष्ट अध्यक्ष असे विविध पुरस्कार मिळवून दिले. आय.एम.ए. संघटनेला विविध सामाजिक उपक्रम व कार्यात अग्रेसर ठेवत डॉ.इंगोले यांनी डॉक्टर्स संघटनेचा अध्यक्ष म्हणून कोरोना काळात सामाजिक बांधिलकीतून विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून संघटनेला समाजाभिमुख केले.
डॉ.राजेश इंगोले यांच्या निवडीबद्दल अंबाजोगाई स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त करीत डॉ.राजेश इंगोले यांना भावी कारकीर्दीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. तर माजी आमदार संजय दौंड, आमदार पृथ्विराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, महादेव आदमाने, डॉ.प्रा.योगेश सुरवसे यांनीही डॉ.राजेश इंगोले यांच्या निवडीचे स्वागत करून मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.