टॉयलेट स्वच्छता प्रकरणी अंबाजोगाईत पडसाद; डॉक्टर विद्दार्थ्यांची निषेध रॅली


नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महविद्यालयात अधिष्ठाता डॉ वाकोडे यांच्या सोबत घडलेल्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई येथे वैद्यकीय शिक्षक संघटना, मार्ड, विद्यार्थी संसद, परिचारिका संघटना, यांनी निषेध रॅली चे आयोजन केले होते. नांदेड येथे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड येथे भेट दिली असता अधिष्ठाता यांना जबरदस्तीने शौचालय साफ करायला लावले हे अत्यंत निंदनीय आहे. या गोष्टीमुळे संपूर्ण देशातील डॉक्टर्स यांचा अवमान झाल्याची भावना डॉक्टरांची आहे त्यामुळे संबंधित खासदार यांनी डॉक्टरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी जोरदार घोषणाबाजी करत केली. या रॅलीसाठी वैद्यकीय शिक्षक, वैद्यकीय विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी, परचारिका उपस्थित होते. यावेळी डॉ मोगरेकर, डॉ नितीन चाटे, डॉ विनोद वेदपाठक, मार्ड चे अध्यक्ष डॉ राहुल मुंडे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी स्वाराती ग्रा. शा. वैद्यकीय महविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांना महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे सर्व वरीष्ठ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक तसेच मार्ड चे पदाधिकारी,8:04 PM – विद्यार्थी संसद चे पदाधिकारी, परिचारिका संघटनांचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले. निषेध व्यक्त करत असताना रुग्ण सेवा विस्कळित होऊ दिली नाही. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी रॅली नंतर उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना निवेदन दिले. रॅली चे नियोजन साठी विद्यार्थी संसद अध्यक्ष अथर्व देशमुख यांनी पदवीपूर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मेहनत घेतली.