केज विधानसभा मतदारसंघातील १४ जिल्हा परिषदेच्या शाळांच्या ३६ वर्ग खोल्यांच्या बांधकामास मंजूरी मिळाली असून निविदा मंजूर झाल्या की बांधकामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली. केज विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्ग खोल्या अभावी दुर्दशा आली होती. जिल्हा परिषदेच्या शाळांमधुन अभावानेच येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल ही व्यवस्थित वर्ग खोल्या नसल्यामुळे कमी होत चालला होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांना अच्छे दीन आणण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील ज्या शाळांमध्ये वर्ग खोल्यांची कमतरता आहे अशा शाळांना वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नामुळे आता केज विधानसभा मतदारसंघातील १४ जिल्हा परिषदेच्या शाळांना जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानातुन ३६ वर्गखोल्या नवा मंजुरी मिळवून दिली आहे.
यामध्ये जिल्हा परिषद शाळा देवळा दोन खोली (18 लाख 38 हजार),जिल्हा परिषद शाळा साकूड (उर्दू)दोन खोली (18 लाख 38 हजार),जिल्हा परिषद शाळा साकूड मराठी चार खोल्या (36 लाख 67 हजार),जिल्हापरिषद शाळा लोखंडी सावरगाव चार खोल्या (27 लाख 50 हजार), जिल्हापरिषद शाळा बनसारोळा तीन खोली (27 लाख 40 हजार), जिल्हा परिषद शाळा विडा पाच खोली (45 लाख 70 हजार), जिल्हा परिषद शाळा जीवाचीवाडी दोन खोली (18 लाख 18 हजार), जिल्हा परिषद शाळा जवळबन दोन खोली (18 लाख 18 हजार), जिल्हा परिषद शाळा आरंनगाव दोन खोली (18 लाख 18 हजार)जिल्हा परिषद शाळा सोनिजवळा दोन खोली (18 लाख 18 हजार),जिल्हा परिषद शाळा सोनिजवळा दोन खोली (18 लाख 18 हजार),जिल्हा परिषद शाळा लादेवडगाव दोन खोली (18 लाख 18 हजार), जिल्हा परिषद शाळा केज दोन खोली (18 लाख 18 हजार), आणि जिल्हापरिषद शाळा नांदूर घाट चार खोली (36 लाख 45 हजार) असा एकूण ३ कोटी १ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली.
सदरील निधी मंजूर करणे कामी खा. डॉ. प्रितम मुंडे व आ. नमिता मुंदडा याच्या प्रयत्नाने शाळा इमारती मंजूर झाल्या. सदरील प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डर झाल्या की लगेच शाळा खोली इमारतीचे कामे सुरु होतील.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.