जयवंती नदीपात्रातील बांधकाम थांबवा पात्र निश्चित करा मागणीसाठी धरणे


जयवंती नदीच्या संवर्धनासाठी व नदीपात्रात करण्यात येत असलेले बांधकाम थांबवण्यात यावे या मागणीसाठी जयवंती नदी बचाव कृती समितीच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे धरण्यात आली.


दोन दिवसांपूर्वीच शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीनंतर जयवंती नदी बचाव कृती समितीची निर्मिती करण्यात आली असून या पुर्वी कृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदन देवून जयवंती नदी पात्रात सुरु असलेले कॉक्रेटीकरण तात्काळ थांबवण्यात यावे, नदीच्या पात्राची तात्काळ निश्चिती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज कृती समितीच्या वतीने शासनाला देण्यात आला होता.
सदरील इषा-या नंतर आज २९ मार्च रोजी जयवंती नदी संवर्धन समितीच्या वतीने आज कृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.


जयवंती नदीपात्रात सुरु असलेले कॉक्रेटीकरण तात्काळ थांबवण्यात यावे, भुमी अभिलेख विभागाकडे असलेल्या जयवंती नदीच्या नकाशानुसार शहरातील संबंधित अधिकारी आणि कृती समितीच्या प्रमुखांषमवेत जयवंती नदी परीक्रमणा यात्रा काढण्यात येवून पात्र निश्चित तेच्या खुणा करण्यात याव्यात, जयवंती नदी पात्रातील अतिक्रमणे काढण्यात यावी अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या आहेत.
या धरणे आंदोलनात शैलेश कांबळे, सुनील जगताप, महेंद्र निकाळजे, गजानन मुंडेगावकर, राजेश वाहुळे, मदन परदेशी, गोविंद मस्के, सचीन चव्हाण, विविध राजकीय सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला संघटनांचे प्रतिनिधी, डिजिटल मेडियाचे प्रतिनिधी व इतर मान्यवरांनी सहभाग घेतला