महाराष्ट्र

चार ही पीठाच्या शंकराचार्यांनी का नाकारले रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

अयोध्येत २२जानेवारीला होणारे राममंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा या सरकारी इव्हेंटचे निमंत्रण देशातील चारही प्रमुख पिठाच्या शंकराचार्यांनी झिडकारल्यामुळे मोठ्या चर्चेला तोंड फुटले आहे. वास्तविक शंकराचार्यच काय कोणाचाही प्राणप्रतिष्ठेला म्हणून विरोध नाहीये.. विरोध आहे तो राजकीय इव्हेंटला ..

पंचांग आणि शास्त्र यानुसार पौष हा महिना मंदिर स्थापना वा मंगलकार्यासाठी अशुभ मानला जातो. मग स्वतः:ला सनातनी म्हणवणाऱ्यांनी अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनासाठी पौष महिनाच का निवडला? कारण त्यानंतर निवडणुका आहेत! अयोध्येतील रामजन्मभूमीवर प्राणप्रतिष्ठा रामनवमीला व्हावी, ही शंकराचार्यांची मुख्य भूमिका होती.. त्यात गैर काय होते?

रामनवमी हा सर्वोत्कृष्ट मुहूर्त होता. पण तो निवडणुकीनंतर असल्यामुळे शेठजींना तो मान्य नव्हता. म्हणून मंदिराचे काम अर्धवट असतानाही आपल्याच हाताने उद्घाटन करण्याचा चंग शेठने बांधला… राममंदिराची स्थापना संतांच्या हस्ते व्हावी, प्रतिष्ठा करणारा सत्यवचनी अधिकार पुरूष असावा.. रोज खोटे बोलणारा, खोटी डिग्री बाळगणारा, लग्न.. बायको लपवणारा झुठा मक्कार नसावा असे पण काही मुद्दे आहेत… राम हा सत्यवचनी होता.. त्याची प्राणप्रतिष्ठा तेवढ्याच तोलामोलाच्या सत्यवचनी गृहस्थाच्या शुभहस्ते व्हावी.. असत्यवचनी व्यक्तीच्या अशुभहस्ते नव्हे .. हा देखील मुद्दा आहे!

अहो, पत्नीसाठी प्रभू रामाने युद्ध छेडलं… त्यातून रामायण घडलं.. पत्नीला पळवणाऱ्या रावणाचा रामानं नि:पात केला… आणि अशा रामाची प्राणप्रतिष्ठा कुणाच्या हस्ते? ज्यानं आपली बायको अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवली, त्याच्या हस्ते? विवाहित असताना जो अविवाहित असल्याचं धादांत खोटं शपथपत्र सादर करतो त्याच्या हस्ते? लग्नाचा जिवंत पुरावा समोर आल्यानंतर पुन्हा विवाहित असल्याचं शपथपत्र देतो.. अशा वारंवार खोटं बोलणाऱ्या माणसाच्या हस्ते..! शंकराचार्यांचा विरोध उगाचच नाही. खोटारड्या व्यक्तीचे हात प्राणप्रिय मर्यादापुरुषोत्तम सत्यवचनी रामाच्या मूर्तीला लागू नयेत… ही सनातन संस्कृती रक्षक शंकराचार्यांची भूमिका असू शकते..

प्राणप्रतिष्ठा रामनवमीला झाली असती.. सनातन संस्कृतीचे प्रहरी असणाऱ्या चारही शंकराचार्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा ठरवली असती.. व फोटो आणि प्रसिद्धीसाठी तळमळणारे पंतप्रधान पहिल्या रांगेत मुख्य अतिथी म्हणून बसले असते तरी चालले असते..पण फोटोजिवी शेठने तेवढा शहाणपणा दाखवायला हवा ना!

प्राणप्रतिष्ठेचा अधिकार वेदमूर्तींचा, संत महात्म्यांचा, शंकराचार्यांचा..! तो धुडकावून जिथे तिथे मीच मिरवलं पाहिजे असं असत्यवचनी नेत्याला वाटत असेल तर … शंकराचार्य तरी काय करणार? टाकला त्यांनी बहिष्कार…गावोगावची गावकरी मंडळी जेव्हा आपापल्या गावात नवनवीन मंदिरे उभारतात.. तेव्हा गावचा सरपंच नाही बसत रे येड्यांनो पुजेला, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला.. धर्माचे व सनातन संस्कृतीचे अधिष्ठान असलेल्या विद्वान व शास्त्रपारंगत व्यक्तीला निमंत्रित करून त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाते. गावातल्या सर्वसामान्य बहुजन वर्गाला जी गोष्ट कळते, ती या भंपक मनुवाद्यांना कळू नये? बरं, एका शंकराचार्यांनी राममंदिराच्या उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला असता तर एकवेळ समजण्यासारखं होतं.. पण आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही दिशांच्या .. शारदा पीठ, पुरी पीठ, शृंगेरी पीठ, बद्रीधाम पीठ… या चारही पिठांच्या शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण धुडकावले याचा अर्थ काय? शंकराचार्यांच्या या झिडकारण्यात राजकीय वास हुंगू नका.. कुठेतरी, काहीतरी चुकतंय.. आत्मपरिक्षण करा…

@ : ग. तु. जोशी, पुणे

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker