महाराष्ट्र

चांदापुर येथे १९ फेब्रुवारी रोजी ९ व्या धम्म परीक्षेचे आयोजन

परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही १९ फेब्रुवारी २०२३ रोजी नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.


या धम्म परिषदेला पुज्य डाॅ.भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा), यांच्या मार्गदर्शना खाली पुज्य भिक्खू प्रा.डाॅ.एम.सत्यपाल महाथेरो (मुळावा), पुज्य डाॅ.भदन्त इंन्दवंस महाथेरो (कुशीनगर), पुज्य भिक्खू धम्मशील थेरो (हिंगोली / बीड) आणि पुज्य भिक्खू रत्नदीप थेरो (औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या धम्म परिषदेचे ” सम्यक संकल्प ” या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याचा लाभ धम्म उपासकांनी घ्यावा असे आवाहन पुज्य भिक्खु धम्मशील थेरो, धम्म परिषदेचे अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर यांनी केले आहे.

तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी, जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी, वसंतनगर तांडा, मौजे चांदापूर, ता.परळी येथे रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी येथे नवव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात सकाळी ९ वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने होईल.
या धम्म परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर हे असणार आहेत.

चंद्रशेखर वडमारे व इतर मान्यवरांची उपस्थिती

तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रदीप रोडे (प्रियदर्शी धम्म संस्कार केंद्र, बीड), नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे, माजी नगरसेवक प्रा.डॉ.विनोद जगतकर, डी.एस.राठोड (संस्थापक, नाईक सेवा शिक्षण प्रसारक मंडळ), संग्राम लक्ष्मण गित्ते (सरपंच, चांदापूर), विलास गायकवाड (उपमुख्याध्यापक, योगेश्वरी नुतन विद्यालय, अंबाजोगाई), प्राचार्य डॉ.अरूण पवार (सखारामजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वसंतनगर), प्रा.विलास रोडे (मिलिंद काॅलेज, परळी वैजनाथ), सौ.शाहू विजय राठोड (सरपंच, वसंतनगर) यांची उपस्थिती लाभणार आहे, ज्या उपासकांना धम्म परीषदेला उपस्थित रहावयाचे आहे. त्या धम्म उपासकांनी पांढरे वस्त्र परिधान करूनच धम्म परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

१० फेब्रुवारी पासून श्रामनेर शिबीराला सुरुवात

तसेच १० फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्रामनेर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा समारोप १९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. ज्या उपासकांना श्रामनेर दिक्षा घ्यावयाची असेल त्यांनी आनंद वाघमारे (पट्टीवडगाव) मोबाईल क्रमांक – ८६६८२६७६५० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी वै. जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदीप रोडे, राजेंद्र घोडके, प्रा.गौतम गायकवाड, राहुल घोडके, जगन सरवदे, सचिन वाघमारे, विश्वनाथ भालेराव आदि प्रयत्न करीत आहेत.

यांनी घेतला पुढाकार

चांदापुर येथे ९ व्या बौध्द धम्म परीषदे निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास या विभागातील उपासकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी व्यंकट वाघमारे, सिमा चंद्रकांत इंगळे आणि संयोजन समितीचे सुरेश मस्के (उजणी), गौतम कांबळे (बागझरी), राजाभाऊ चक्रे (साळुंकवाडी), जालींदर कसबे- (साळुंकवाडी), सुरेश विजय कांबळे (पट्टीवडगाव), अशोक कांबळे (पट्टीवडगाव), वैजनाथ कांबळे (पट्टीवडगाव), प्रसिध्दीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर, सत्यपाल वाघमारे (पट्टीवडगाव), बौध्दाचार्य मुरलीधर कांबळे, माणिक रोडे, मिलिंद नरबागे, राज जगतकर, भारत जगताप, प्रा.बी.एस. बनसोडे, दत्ता सरवदे, सुगत सरवदे, हमीद चौधरी, किशोर इंगळे, प्रा.मधुकर शिनगारे, संजय साळवे (पुस), सुरेखा रोडे, अर्जून काळे, आकाश वेडे, विनोद रोडे, धनंजय जोगदंड, सुशिल इंगळे, रूक्मिण गोरे, संजय सिंगनकर, सुहासिनी इंगळे, स्वप्निल रोडे, बंडू इंगळे, विजय हजारे, धम्मानंद मस्के, चांगुनाबाई हिरवे, पार्वती वेडे, उर्मिला वैद्य, कांताबाई बोराडे (भिमनगर), सुचिता सोनवणे, सुनंदा शिंदे, लता बडे, शिला जोगदंड (बोधीघाट), तुळसाबाई काळे, विद्या लक्ष्मण बाघमारे, पुष्पा गुणाजी होके, बाबा बाघमारे, एम.एम. गायकवाड, अमोल जगताप (नंदागौळ), लालनगर, क्रांतीनगर, कबीरनगर महिला मंडळ व रमाई आंबेडकर चौक महिला मंडळ, अंबाजोगाई आदींनी पुढाकार घेतला आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker