चांगला माणूस बना आनंदीजीवन जगा; पंकजा मुंडे यांचे तरुणाईला आवाहन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0176-300x200.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0176-300x200.jpg)
आयुष्यात खूप संघर्ष, उतार- चढाव, स्पर्धा असली तरी आजच्या तरूणाईने निराश न होता, खचून न जाता, आपले स्वप्न, ध्येय पुर्ण करण्यासाठी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे, आपल्यातील ऊर्जा, उल्हास आणि शक्ती याचा वापर नेहमीच विधायक कार्यासाठी करावा नवे तंत्रज्ञान आणि मोबाईलचा वापर करताना तरूण पिढीने किती प्रभावीत झाले पाहिजे हे ठरविले पाहिजे एखाद्या गोष्टीत यश नाही मिळाले तरी पर्याय शोधले पाहिजेत. कारण, जीवन ही सतत चालणारी बाब आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0178-300x200.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0178-300x200.jpg)
जीवनात अनेक संधी मिळतात. तेंव्हा सर्वकाही “ऑल इज वेल” आहे हे गृहित धरून आपल्याकडे ज्या गोष्टी कमी आहेत. त्याचा कधीही न्यूनगंड बाळगु नका व जे जास्त आहे त्याचा ही मनात अहंकार ठेवू नका, आत्ताचे क्षण आनंदाने जगा, खूप अभ्यास करा, आई-वडील, ज्येष्ठांचा आदर ठेवा, महिलांचा सन्मान करा, गुरूजणांविषयी कृतज्ञता भाव बाळगा, राष्ट्रभक्ती जोपासा, आपले व्यक्तीमत्व आकर्षक, उत्तम आणि सुंदर कसे राहिल, याकडे लक्ष द्या, कर्मा एवढा मोठा सिद्धांत आयुष्यात कोणताही नाही तेंव्हा श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा बाळगू नका, निर्व्यसनी रहा, भारताचा एक सुजाण नागरीक आणि चांगला माणूस बना व आनंदी जीवन जगा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी आजच्या तरूणाईला केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0175-300x200.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0175-300x200.jpg)
अंबाजोगाईत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन 2023 चे शानदार उद्घाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाशिप्र संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.सौ.कल्पना चौसाळकर, राम कुलकर्णी, अप्पाराव यादव, अविनाश तळणीकर, सौ.वर्षाताई मुंडे, डॉ.पी.आर.कुलकर्णी, सौ.उषाताई मुंंडे, विष्णुपंत कुलकर्णी, प्राचार्य डॉ.मुकुंंद देवर्षी, उपप्राचार्य तथा स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डॉ.बिभीषण फड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0177-240x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0177-240x300.jpg)
प्रारंभी दीपप्रज्ज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या संगीत विभागातील संचाने स्वागतगीत सादर केले. वैयक्तीक पद्य प्रा.शैलेश पुराणिक यांनी सादर केले. प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलन हे आनंदाची शिदोरी आहे. विद्यार्थी जीवनातील सर्वांत आनंदाचा क्षण स्नेहसंमेलन असते. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याचे काम त्यांच्या व्यक्तीमत्वाला घडविणे, त्यांची जडण – घडण करणे सामाजिक बांधिलकी जपून राष्ट्रभक्त नागरीक घडविणे याला संस्था व महाविद्यालयाचे प्राधान्य असल्याचे नमुद करून मागील वर्षभरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, उपक्रम, समारंभ यामध्ये संस्था व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले असे सांगून वर्षभराचा आढावा घेतला. त्यानंतर खोलेश्वर महाविद्यालयास सी.सी.टी.व्ही. खरेदी करीता देणगी देणारे शिक्षणतज्ज्ञ डॉ.पी.आर.कुलकर्णी यांचा महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले की, पंकजाताई या तरूण पिढीचा आयडॉल आहेत. त्या राजकारणातील प्रभावी नेत्या आहेत. त्यांचे संस्थेशी जुनेच ऋणानुबंध आहेत. आपल्या व्यस्ततेतून त्यांनी संमेलनाच्या उद्घाटनासाठी वेळ दिला. ताई नेहमीच संस्था व महाविद्यालयाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असतात असे कुलकर्णी यांनी नमुद केले. ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी स्नेहसंमेलनातून आपल्या कलागुणांना वाव मिळतो. कॉलेज जीवनातील मैत्री आयुष्यभर टिकविणे, मित्र कमविणे ही मोठी बाब असल्याचे सांगून तरूण वय हे एकिकडे जबाबदारी नसलेले आणि दुसरीकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जबाबदारी शिकविणारे असते. सामाजिक बांधिलकी व राष्ट्रभक्तीचे शिक्षण स्नेहसंमेलनातून मिळते असे सांगून मन, शरीर व मजबूत विचारांना ही मजबूती देण्याचे काम तरूण वयातच घडते. असे सांगुन मुंदडा यांनी स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना भाशिप्र संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलातील गुणवंत, यशवंत व किर्तीवंत विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान असल्याचे सांगुन भाशिप्र संस्थेच्या माध्यमातून तरूण पिढीत देशसेवा व समाजसेवेची बिजे रूजविण्याचे कार्य केले जाते असे सांगून महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांनी आपल्या कर्तृत्वाने संस्थेचे नांव यापुढे ही असेच उज्ज्वल करावे. देशाच्या जडण – घडणीत आपले योगदान द्यावे, भारतीय संस्कृतीचे जतन करावे असे आवाहन डॉ.वैद्य यांनी या प्रसंगी केले. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन विद्यार्थी चि.रामदास शिंदे व विद्यार्थीनी कु.अर्पिता आरबाड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ.बिभीषण फड यांनी मानले. प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अंताक्षरी, शेलापागोटे या उपक्रमात सहभाग घेतला. त्याचे बहारदार सुत्रसंचालन प्रा.कालिदास चिटणीस यांनी केले. खोलेश्वर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक, कर्मचारीवृंद उपस्थित होते.