महाराष्ट्र

घनवृक्ष लागवडीच्या “बीड पॅटर्न” ची राज्यभर होणार अंमलबजावणी!

बीड शहरातील जालना रोड परिसरातील श्री बंकटस्वामी महाविद्यालयाने दंडकारण्य प्रकल्प यशस्वी करून दाखवला आहे. 11 महिन्यांमध्ये या प्रकल्पाअंतर्गंत लावण्यात आलेल्या झाडांची चांगली वाढ झाली आहे. या यशस्वी प्रकल्पाची नोंद राजभवनाने घेतली असून राज्यातील सर्वच विद्यापीठांनी असा प्रकल्प राबवावा अशा सूचना केल्या आहेत.

लॉकडाऊन काळत महाविद्यालय परिसरात दोन गुंठे क्षेत्रावर 48 प्रकारच्या 560 वृक्षांची लागवड करण्यात आली होती. महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने हे वृक्षारोपण करण्यात आले. 5 ऑगस्ट 2020 रोजी लावलेल्या वृक्षांमुळे केवळ 11 महिन्यातच परिसरात एक घनदाट दंडकारण्य निर्माण झाले. आता झाडाची उंची 15 ते 17 फुटांपर्यंत वाढली आहे.

▪️राज्यपालांना पाठवला प्रस्ताव
श्री बंकटस्वामी महाविद्यालयामध्ये प्रकल्प यशस्वी झाला. त्यानंतर प्राचार्यांनी कुलपती घनवन योजना तयार करावी असा प्रस्ताव राज्यपाल कार्यालयाकडे पाठवला. या प्रस्तावाचे नाव देखील याच कॉलेजने सुचवले. राज्यपालांकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे.
▪️ सर्व विद्यापीठात राबवणार
कुलपती घन योजना

राज्यातील सोळा विद्यापीठाअंतर्गत हजारो महाविद्यालय आहेत. बंकटस्वामी महाविद्यालयाची घनदाट वृक्षाची चळवळ आता राज्यात पोहोचली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या विद्यापीठांनी बंकटस्वामी कॉलेजशी संपर्क साधून वृक्षलागवडीची माहिती घेतली आहे.

या वृक्षांमुळे एक नैसर्गिक जंगल विकसित झाले. झाडांमुळे मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, खार, मुंगूस, पशुपक्षांचे वास्तव्य झाले. या वृक्षांचा फायदा असा की, परिसरातील तापमान तीन ते चार डिग्री सेल्सिअसने कमी झाले आहे. शुद्ध ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे.
▪️या झाडांची लागवड
अडुळसा, कोरफड, तुळस, मोगरा, कणेर, जास्वंद, मेंहदी, पारिजातक, शतावरी, गवती चहा, करवंद, मधुमालती, रातराणी, कढीपत्ता, चंदन, शिसम, मेडशिंगी, तरवड, भुईउबर.

▪️या झाडांची लागवड
उपवृक्ष वृक्ष

करंज, भोकर, बेल, बहावा, सीताअशोक, पळस, नाकेश्वर, कवट, सिसम, टेमरू, आवळा, कोकम, शमी, खैर, शेवगा, कांचन, पळस, निंबू, बेल, सिताफळ, रामफळ, पेरू, चंदन, बोर, अंजीर, उंबर, तुती, शेवगा, हिरडा.

छतवृक्ष

वर, पिंपळ, आंबा, साग, भेडा, अर्जुन, मोहगणी, फणस रुद्राक्ष.

महाविद्यालयाने चालू केलेल्या प्रकल्पाबद्दल पंचक्रोशीत मोठी चर्चा होत आहे. दंडकारण्य पाहण्यासाठी वनअधिकारी, विद्यार्थी, शेतकरी भेटी देत आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker