खतांची गाडी अनलोड करतांना कामगाराचा -हदयविकाराने मृत्यू
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230412-WA0234-256x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230412-WA0234-256x300.jpg)
येथील मोंढा विभागातील नरसिंह कृषी सेवा केंद्र येथील कामगार सर्जेराव सीताराम राठोड यांचा खताचे पोते उतरतांना ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असल्याचे समजते.
होंडा विभागात सर्जेराव राठोड हे गेली अनेक वर्षांपासून समाधीचे काम करतात. आज नृसिंह कृषी सेवा केंद्रात खतांची गाडी आली असतांनाच ती रिकामी करण्याचे काम सर्जेराव करीत होता. खतांचे पोते उतरत असतानाच सर्जेराव यास -हदयविकाराचा त्रास सुरु झाला. सर्जेराव यास -हदयविकाराचा त्रास सुरु असतांनाच त्यास तातडीने येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेत असतांनाच सर्जेराव यांचे निधन झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सर्जेराव राठोड यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण मोंढा परीसरातील वातावरण शोकाकुल झाले आहे. सर्जेराव राठोड यांच्या अकाली निधनाने होंडा परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.