केज तालुक्यात बालविवाह;आईवडील, नवरदेवासह ७ जणांवर गुन्हा दाखल
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230224_203533-277x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230224_203533-277x300.jpg)
दहावी वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छे विरुद्ध लग्न लावून दिले. तिने हे लग्न मान्य नाही व नांदणार नाही. असे म्हणताच वडील, आजोबा आणि मामाने तिला एका गाडीत बसवून अज्ञात स्थळी सोडून पोबारा केल्याची घटना घडली आहे.
मुलींच्या आईवडीलासह ७ जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी मुलीचे आई वडील, आजोबा, मामा, सासू सासरे आणि नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील एका दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या इच्छे विरुद्ध दि. १६ फेब्रुवारी रोजी तिच्या मामाच्या गावी मांगवडगाव ता. केज येथील शेतात औरंगाबाद येथील एका तरुणासोबत लावून दिला. सदर अल्पवयीन मुलगी ही त्या विवाहास तयार नसताना बळजबरीने व धमकी देऊन तिचा विवाह लावून देण्यात आला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230224_203550-1024x471.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230224_203550-1024x471.jpg)
त्या नंतर सासू-सासरे आणि नवऱ्यासोबत एका गाडीने घेऊन ते औरंगाबादला घेऊन गेले. औरंगाबादला गेल्यास त्या रात्री अल्पवयीन मुलीने तिला हे लग्न मान्य नसल्याने इथे राहणार नाही, असे सांगीतले. तेव्हा तिला सासरच्या मंडळींनी धमकावले तसेच तिच्या आई-वडिलांना फोन केला आणि हा प्रकार सांगितला.