कविता नेरकर मुंबई सायबर विभागाच्या नव्या पोलीस अधीक्षक !
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/11/IMG_20231121_115213-1002x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/11/IMG_20231121_115213-1002x1024.jpg)
जिल्हा अधीक्षक म्हणून प्रमोशनवर झाली बदली
अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख कविता नेरकर यांची मुंबई येथे सायबर विभागात पोलीस अधीक्षक या पदावर बदली झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे अव्वर सचीव स्वप्नील बोरसे यांनी राज्यातील १३ वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले आहेत. या आदेशात कविता नेरकर यांची मुंबई येथील सायबर विभागात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कविता नेरकर यांनी अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अंत्यंत चांगल्या पध्दतीचे कामे केले होती. पोलीस प्रशासनाच्या कार्यासोबतच शहर व परिसरातील सामाजिक उपक्रमात ही त्यांची सतत उपस्थिती असायची. अंबाजोगाई येथील प्रदीर्घ कारकीर्दी नंतर आता त्यांच्या वर मुंबई येथील सायबर विभागात पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. कविता नेरकर यांना पोलीस प्रशासनातील उज्वल कारकीर्दीसाठी माध्यम न्यूज नेटवर्क च्या वतीने शुभेच्छा!