नांदेड

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते राज्यात रुग्णमित्र अभियानाचा शुभारंभ! – डॉक्टर अजित गोपछडे.

संयोजक रुग्ण मित्र अभियान व भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व टीम संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळापर्यंत जाऊन आरोग्य सेवक टीम प्रशिक्षित करून अहोरात्र परिश्रम करणार

लोकनेते व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात ५० हजार रुग्णमित्र तयार करण्याच्या भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या महत्वपूर्ण रुग्णमित्र अभियानाचा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते झाले.

या वेळी प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार श्री. आशिषजी शेलार, श्री. प्रविणजी दरेकर, श्री. प्रसादजी लाड आदींची उपस्थिती होती.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात रुग्णमित्र अभियान संयोजक डॉक्टर अजित गोपछडे. भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, प्रभारी रामेश्वर नाईक, संयोजक डॉ. बाळासाहेब हरपळे, सहसंयोजक डॉ. राहुल कुलकर्णी यांच्यासह वैद्यकीय आघाडीच्या विविध प्रकोष्टचे संयोजक व पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.

या अभियानात प्रत्येक गावात दोन रुग्णमित्र तयार केले जाणार आहेत. या रुग्णमित्रांकडून नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली जाईल. रुग्णाला अॅम्ब्युलन्स व सर्व मदत मिळवून देण्याबरोबरच, त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी अद्ययावत व योग्य रुग्णालयाची व डॉक्टर्स ची माहिती उपलब्ध होणार आहे.

या अभियानात सहभागी होण्यासाठी *९६४९४८५२४२* या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, असे आव्हान डॉक्टर अजित गोपछडे यांनी या वेळी केले.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker