महाराष्ट्र

आ.नमिता मुंदडा वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या ६ मुलींच्या नांवे केली एफडी

केज विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नामिताताई अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि:04/03/23 रोजी उपजिल्हा रुग्णालय केज या रुग्णालयात शनिवारी जन्मलेल्या मुलीच्या नावे प्रत्येकी 5000 रु जमा करण्यात आले आहेत.ही रक्कम त्यांना वयाच्या 18 व्या वर्षी 40,000 एवढी मिळणार असून त्याचे बॉण्ड संबंधित मुलीच्या आईला देण्यात आले. आज जन्म झालेल्या मता 1)यादव पार्वती बबन 2)सारूक सीमा दत्तात्रय 3) शेख सानिया आमेर 4)तबसून सादिक पटेल 5) अंजुम सुलतान शेख 6)माने अलका उमेश या आहेत.

या वेळी सदरील बॉण्ड वाटप करते वेळी बीड जिल्हा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाअध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर,जेष्ठ नेते सुनील (आबा) गलांडे ,माजी उपसभापती रामकृष्ण (काका) घुले,भगवान सेनेचे जिल्हाअध्यक्ष मुरली (बाप्पा) ढाकणे भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्या हस्ते बॉण्ड वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध शिंदे,शरद इंगळे, युवा नेते राहुल भैय्या गदळे, सुनील (भाऊ) घोळवे,अतुल इंगळे,सुरेश नांदे सर ,सुरेश (नाना) थोरात,शिवाजी पाटील,खदीर खुरेशी यांनी केले होते.

या कार्यक्रमासाठी सुदाम पाटील,डॉ संभाजी वायबसे,महादेव जाधवर, भैरू सोळंके,वसंत सोनवणे,मच्छिंद्र जोगदंड, संतोष जाधव,मोबिनभाई,अखिलेश खुरेशी,हकिमभाई, शम्मूभाई,बाळासाहेब राऊत,चंदु मिसाळ,अर्जुन बनसोडे, तुळशीदास ढाकणे,नवनाथ बिक्कड,विलास जाधव,बीबीशेन भोसले,महादेव घुले,दैवन सोनवणे, विण्शु थोरात,अशोक काकडे,दत्ता सावंत,संदीप सोनवणे,व प्रसिद्धी प्रमुख प्रकाश मुंडे व अविनाश पाचांळ हे उपस्थित होते, यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.चाळक साहेब डॉ करपे साहेब मेट्रन शिवकांता गवळी मोटेगावकर सिस्टर,भोपळे सिस्टर,वाघमारे ,पॉल, म्हेत्रे क्षीरसागर, घोळवे कदम,साठे मावशी अंभोरे पल्लवी हे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker