महाराष्ट्र

आ. नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी आ. पंकजा मुंडे ऍक्शन मोडवर!

केज शहर व परिसरातील नाराज कार्यकर्त्यांना लावले कामाला !

केज विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी अवघा दहा दिवसांचा कालावधी उरला असतांनाच भाजपाच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे या ऍक्शन मोडवर आल्या आहेत. केज मतदार संघातील नाराज भाजपा कार्यकर्त्यांची त्यांनी एक व्यापक बैठक घेऊन या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी आपली शक्ती आ. नमिता मुंदडा यांना विधानसभेत पाठवण्यासाठी वापरावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुक मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतशी मतदार संघातील चुरस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत मतदार संघातील नाराज कार्यकर्त्यांना परत एका छताखाली एकत्र आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. ही कसरत पुर्णपणे आणि चांगल्या पद्धतीने करण्यात आ. नमिता मुंदडा यांनी आपले नियोजन लावले आहे.

केज विधानसभा मतदारसंघात रमाकांत बापू मुंडे सारखे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेली अनेक दिवसांपासून आ. नमिता मुंदडा गटांशी संपर्कात नव्हते. स्थानिक पातळीवर काही किरकोळ कारणावरून दुरावा वाढत गेला आणि टोकाचे मतभेद निर्माण झाले. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आ. नमिता मुंदडा यांना सहकार्य करायचे नाही इथपर्यंत हे कार्यकर्ते पोहोचले होते.

मात्र निवडणुकीपूर्वी मतदानाला काही दिवस शिल्लक असतांनाच केज शहर व ग्रामीण भागातील काही नाराज कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांची बैठक भाजपाच्या राष्ट्रीय सचीव आ. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत घेवून या कार्यकर्त्यांचे सर्व गा-हाने एकुण घेवून त्यांची समजूत घालून त्यांना भाजपाचे उमेदवार आ. पंकजा मुंडे यांच्या प्रचारयंत््रणेत सहभागी होऊन त्यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले.

प्राप्त माहितीनुसार भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी केज शहर व परिसरातील कार्यकर्त्यांची ही महत्वाची बैठक झाली असून या बैठकीत भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आ. पंकजा मुंडे यांनी या सर्व कार्यकर्त्यांची नाराजी दूर केल्यानंतर केज मध्ये उमेदवार मी आहे असे गृहीत धरून तन-मन-धनाने कामाला लागा अशा सूचना करताच या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आ. पंकजा मुंडे यांना “ताई तुम्हाला केज विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र बदल केल्याशिवाय आम्ही तुम्हाला भेटणार नाही असे.” अभिवचन दिल्याचे समजते.

आ. पंकजा मुंडे यांनी आणखीन काही प्रमुख कार्यकर्त्यांना बंद दाराआड चर्चा करून सर्वांना सक्रिय करणार असल्याने भाजप कार्यकर्त्यात नवचैतन्य आल्याची चर्चा होत आहे भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या घरी काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली या बैठकीला भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी ,संतोष हांगे, रमाकांत मुंडे, राणा डोईफोडे, विष्णू घुले, विजयकांत मुंडे आदी मान्यवर उपस्थित असल्याचे समजते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker