महाराष्ट्र

अफु लागवड प्रकरणातील १७ आरोपींची निर्दोष मुक्तता; अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

अफूची लागवड केल्याप्रकरणी १७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. येथील २ रे जिल्हा व सत्र न्यायालयात स्पेशल केस क्र. ०३/१२ व ४/१२ सरकार वि.परमेश्वर व सरकार वि.वसंत याप्रकरणाची सुनावणी होऊन न्या.संजश्री घरत  यांनी दि.११/०४/२०२३ रोजी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

२०१२ साली मोहा घोरटडदरा तांडा येथील प्रकरण

सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, मौजे मोहा, घोरपडदरा तांडा ता. परळी शिवारात कॉलम नंबर १० मधील आरोपी नी विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वतः चे मालकीचे व वहिवाट करीत असलेने फिर्याद मध्ये नमुद गट नंबर शेतात अफुचे गवताची अफुचे झाडाची लागवड करून ती जोपासून त्याचे पिक ( बोंडे) चोरुन विक्री करण्यासाठी ताग्यात बाळगलेल असतांना फिर्यादी व सोबतचे अधिकारी यांनी मिळालेल्या माहिती वरुन दिनांक २५.०२.२०१२ रोजी १३.३० वा. सदर आरोपीच्या मोहा. घोरपड तांडा गावच्या शिवारातील शेतात छापा मारला असता.

(संग्रहित छायाचित्र)

२ एकर २५ गुंठे क्षेत्रावर ४९.५ लक्ष किंमतीच्या आपशफूची केली होती लागवड

एकुण २ एकर २५ गुंठे क्षेत्रात ७३३० कि. ग्रॅम वजनाचे ४९,३७,५००/- रुपये किंमतीचे अफूचे (ओले ) पिक मिळुन आले आहे. मौजे मोहा, घोरपडदरा तांडा ता. परळी शिवारात कॉलम नंबर १० मधील आरोपी  यांनी विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वतः चे मालकीचे व वहिवाट करीत असलेने फिर्याद मध्ये नमुद गट नंबर शेतात अफुचे गवताची अफुचे झाडाची लागवड करून ती जोपासून त्याचे पिक ( बोंडे ) चोरून विक्री करण्यासाठी ताब्यात बाळगलेल असतांना फिर्यादी व सोबतचे अधिकारी यांनी मिळालेल्या माहिती वरुन दिनांक २५.०२.२०१२ रोजी १३.३० वा. सदर आरोपीच्या मोहाघोरपडदांडा गावच्या शिवारातील शेतात छापा मारला असता. एकूण १ एकर २५ गुठे क्षेत्रात ७३३० कि. ग्रॅम वजनाचे ४९,३७,५००/- रुपये किंमतीचे अफूचे (ओले ) पिक मिळुन आले आहे.सदर अफुचे पिकाची आरोपीनी स्वतः चे शेतात विनापरवाना बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती कोणत्याही पोलीस अधिकान्यांना किंवा कलम ४२ एनडीपीएस मध्ये नमुद करण्यात आलेल्या विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना जाणीव पुर्वक दिलेली नाही. म्हणुन आरोपी यांचे विरुध्द कलम ८(ब) १८.४६३८ एनडीपीएस अॅक्ट १९८५ प्रमाणे गुन्हा केल्याचा चार्ज आहे.

(संग्रहित छायाचित्र)

१७ साक्षीदारांची झाली तपासणी

सदरील प्रकरणाची सुनावणी मा.न्यायालयात झाली असता एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले, आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद व बचाव गृहीत धरून  सदरील स्पेशल केस क्र. ०३/१२ प्रकरणातील आरोपी प्रकाश हरिश्चंद्र काळे रा.कऱहेवाडी तसेच व स्पेशल केस क्र. ०४/१२प्रकरणातील आरोपी वसंत भिमराव चाटे, विलास बाळासाहेब शिंदे,रा.मोहा,गणपत रावजी राठोड,महादेव नेमा राठोड,सुदाम प्रभू राठोड,शिवाजी दगडू राठोड, सुरेश नेमा राठोड रा.घोडपर दरा तांडा ता परळी वैजनाथ यांची व इतरांची मा.न्या.संजश्री घरत मॅडम यांनी दि.११/०४/२०२३ रोजी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

ऍड. अजित लोमटे आरोपींचे वकील

सदर प्रकरणात वरील आरोपीतर्फे ऍड.अजित लोमटे यांनी काम पाहिले.त्यांना ऍड.किशोर देशमुख,ऍड.नवनाथ साखरे,ऍड.धनराज लोमटे, ऍड.ओमप्रकाश धोत्रे,ऍड.विश्वजित जोशी व ऍड.विवेकानंद गिराम यांनी सहकार्य केले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker