अन्नत्याग आंदोलन निमित्ताने १९ मार्च रोजी पत्रकार वसंत मुंडे यांचे व्याख्यान
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230201_142736-1024x738.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230201_142736-1024x738.jpg)
१९ मार्च या दिवशी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने जगभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. यावर्षी अन्नत्याग आंदोलना सोबतच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंबाजोगाई येथे गेली सात वर्षांपासून १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासर्व कार्यक्रमात या विभागातील शेतकरी आणि त्यांची मुलं मोठ्या हिरीरीने सहभाग घेत असतात. यात महिलांची संख्या विलक्षणीय असते हे महत्त्वाचे आहे.
यावर्षी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन निमित्ताने दिवसभर अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेल्या किसान आणि किसान पुत्रांना सामुहिक उपवास सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले असून याला जोडुनच शेतकरी प्रश्नांचे आणि शेतकरी आत्महत्यांचे अभ्यासक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किसान पुत्र वसंत मुंडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230201_143925-1024x857.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230201_143925-1024x857.jpg)
अंबाजोगाई नगर परिषदेच्या गार्डन मध्ये हा कार्यक्रम १९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणा-या सर्व किसान पुत्रांना एकत्रित येऊन उपवासाची सांगता करता यावी यासाठी या सांगता समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने नगर परिषदेच्या गार्डन मध्ये सायंकाळी चार वाजता पत्रकार वसंत मुंडे यांचे व्याख्यान होईल आणि त्या लगोलग सांगता समारोह होईल. या समारोहात उपवास सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230201_143937-1024x707.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230201_143937-1024x707.jpg)
या सर्व कार्यक्रमास अंबाजोगाई शहर आणि परिसरातील किसान पुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब, स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार, वैजनाथ शेंगुळे, अनिरुध्द चौसाळकर, बालासाहेब केंद्रे, वसंत मोरे (माजी सरपंच मोरेवाडी), दत्ता वालेकर, जगदीश जाजू, प्रा. शैलजा बरुरे, ज्योती शिंदे, ऍड. संतोष पवार, सुभाष बाहेती, चंद्रशेखर वडमारे, शेख जमील, रोटरी क्लब अंबाजोगाई, ज्येष्ठ नागरिक संघटना, मानवलोक व इतर संघटनांनी केले आहे.