अनधिकृत १२ तलवारी बाळगणा-यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अंबाजोगाई पोलिसांची कारवाई
अंबाजोगाई व परिसरात गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगणाऱ्या ममदापुर येथील आदित्य काटे या आरोपीच्या अंबाजोगाई पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्याच्या कडुन 12 तलवारी जप्त करण्यात आलेल्या असुन पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
गणपती उत्सव व ईद-ए-मिलाद सनाच्या अनुशंघाने बीड जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर साहेब व अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद घोळवे, पोलीस निरीक्षक अंबाजोगाई यांनी अंबाजोगाईतील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी या करीता शर्तीचे प्रयत्न चालविले असुन दि. २२/०९/२०२३ रोजी गोपनिय बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे लातुर रोड पाण्याची टाकी अंबाजोगाई येथे एक इसम हातात तलवार घेवुन फिरत आहे अशी माहीती मिळाल्या वरुन पोलीस स्टेशन अंबाजोगाईचे पथक सदर ठिकाणी जावुन अचानक छापा मारला असता ईसम नामे आदीत्य आनंद काटे वय १९ वर्षे रा. ममदापुर ता. अंबाजोगाई असे सांगीतले त्याचे ताब्यात एक तलवार मिळुन आली.
विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर, बालक कोळी पो नी ग्रामीण पोलीस स्टेशन, चाँद मेंढके पोलीस उप निरीक्षक पोह/१६७१ गायकवाड, पोह/ ९७३ घोळवे, पोअ/ ५०९ लाड, पोअं/ २०२० नागरगोजे, पो८९० चादर, पोअं/ १७० काळे, चालक पो.कॉ/१९८० व्हावळे, होमगार्ड मुसा शेख यांनी त्याचे कडे अधिक विचारपुस केली असता त्याने अदयाप पावेतो गुन्हयाचे तपासा दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील राडी व ममदापुर शिवारात लपवून ठेवलेल्या १२ तलवारी किंमत अंदाजे १८,०००/- रुपये किंमतीचे काढुन दिलेल्या असुन आनखीन तलवारी जप्त होण्याची शक्यता आसुन या प्रकरणी पो हे कॉ अमोल गायकवाड यांच्या फिर्यादी वरून गु र न 364/23 कलम 4, 25 भारतीय शस्त्र कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
शस्त्र बाळगणा-यांवर होणार कारवाई
गणेशोत्सव व ईद च्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेने नागरीकांना आव्हान केले आहे कि, अशा प्रकारचे शस्त्र बाळगण्याचे कृत्य करु नये पोलीस यंत्रणा अशा घटनावर लक्ष ठेवुन आहे. कोणी अशा प्रकारचे कृत्य केल्यास त्याचेवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.