अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांना आऊटस्टॅंडिंग टिचर अवार्ड


स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे सर यांना इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया ऍण्ड केरॅटोरिफरॅक्टिव्ह (ISCKRS) सर्जन यांच्या तर्फे “आऊटस्टॅंडिंग टिचर अवार्ड” हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
येत्या २७ जानेवारी रोजी गोवा येथील हॉटेल मेरक्युअर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री मा. श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. जिवन टिटीयाल, सचीव डॉ. राजेश दरक यांनी दिली आहे.


सदरील आऊटस्टॅंडिंग टिचर अवार्ड मिळाल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचा सत्कार करताना मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, प्रा. मेजर शांतीलाल बनसोडे, प्रा. पंडीत कराड, चंद्रशेखर वडमारे, डॉ. राकेश जाधव, डॉ. विनोद वेदपाठक यांच्या समवेत.